मुंबई

जीएसटी, टीडीएस व्यवस्थापनासाठी तज्ज्ञ सल्लागारांची नियुक्ती करणार

CD

जीएसटी, टीडीएस व्यवस्थापनासाठी तज्ज्ञ सल्लागारांची नियुक्ती करणार
महापालिकेचा आर्थिक कारभार होणार अधिक सुटसुटीत
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २१ : महापालिकेचा अवाढव्य आर्थिक व्यवहार आणि कर प्रणाली अधिक पारदर्शक व त्रुटीमुक्त करण्यासाठी प्रशासनाने आता महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पालिकेच्या विविध विभागांतील जीएसटी परतावा आणि टीडीएस संबंधित तांत्रिक कामांसाठी विशेष सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या कामासाठी पात्र कंपन्यांना २७ फेब्रुवारीपर्यंत निविदा सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
​मुंबई महापालिका ही आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका मानली जाते. दरवर्षी हजारो कोटींचे कंत्राट, खरेदी आणि सेवा शुल्काचे व्यवहार पालिकेमार्फत केले जातात. या व्यवहारांमध्ये ​जीएसटी परतावा ज्यात मासिक आणि वार्षिक जीएसटी विवरणपत्रे अचूक भरणे,​ टीडीएस व्यवस्थापन ज्यात कंत्राटदारांच्या बिलातून कापल्या जाणाऱ्या टीडीएसचा हिशोब ठेवणे आणि तो वेळेत सरकारकडे जमा करणे, ​नियम पूर्तता ज्यात जीएसटी कायद्यातील बदलांनुसार पालिकेच्या लेखा प्रणालीत सुधारणा करणे आणि सरकारी नोटिशींना उत्तर देणे यांचा समावेश आहे.
​​निवडलेला सल्लागार पालिकेच्या मुख्य लेखापाल विभागासोबत समन्वय साधून काम करेल. त्‍यामुळे कर प्रणालीत होणाऱ्या चुका टाळता येतील आणि पालिकेचा महसूल वाचवण्यास मदत होईल. विशेषतः मोठ्या प्रकल्पांच्या देयकांमध्ये जीएसटीच्या तांत्रिक बाबी गुंतागुंतीच्या असतात तिथे या तज्ज्ञांची भूमिका महत्त्वाची ठरेल, असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.
जीएसटी आणि टीडीएसचे नियम सतत बदलत असतात. पालिकेचा आर्थिक व्यवहार मोठा असल्याने तज्ज्ञ सल्लागारांच्या मदतीने कर कायद्यांचे पालन करणे आणि परतावा मिळवणे सोपे होईल, असे महापालिकेच्या वित्त विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

२७ तारखेपर्यंत निविदांना मुदत
​इच्छुक चार्टर्ड अकाउंटंट (सीए) फर्म्स किंवा कर सल्लागार कंपन्यांना आपली निविदा सादर करण्यासाठी २७ फेब्रुवारी २०२६ ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. तांत्रिक निकषांवर आधारित सर्वोत्तम सल्लागाराची निवड पालिकेच्या समितीमार्फत केली जाईल.​

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

Latest Marathi News Live Update : जेव्हा कधी काहीतरी चांगले घडते, तेव्हा विरोधक तक्रारी करतातच, नारी शक्ती वंदन विधेयकावर कंगना रानौत यांची प्रतिक्रिया

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकचे शतक, मोडला MS Dhoni चा विक्रम! युझवेंद्र चहलची एक चूक अन् पंजाब किंग्सच्या मेहनतीवर पाणी

Aarey Milk: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ‘आरे’ दूध पुन्हा बाजारात येणार, तारीख आली समोर, स्टॉलधारकांना दिलासा

SCROLL FOR NEXT