मुंबई

राज्यसभेत पुन्हा राऊत-चतुर्वेदीच हवेत!आदित्य ठाकरे, •शिवसेना (ठाकरे) दोन्ही जागा लढवण्यावर ठाम

CD

राज्यसभेत पुन्हा राऊत, चतुर्वेदीच हवेत!
युवानेते आदित्य ठाकरे यांचे मत; दोन्ही जागांवर प्रबळ दावा
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २१ : आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपल्या दोन्ही जागांवर दावा प्रबळ केला आहे. संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांनी संसदेत बजावलेली कामगिरी पाहता या दोन्ही जागा पुन्हा शिवसेनेकडेच राहाव्यात, असे स्पष्ट मत पक्षाचे युवानेते आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

यावर प्रसारमाध्यमांना आदित्य ठाकरे यांनी सांगितले, की ​सध्याच्या राजकीय परिस्थितीत संसदेत प्रभावीपणे आवाज उठवणाऱ्या खासदारांची देशाला आणि राज्याला गरज आहे. संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांनी गेल्या काही वर्षांत प्रखर विरोधी पक्षाची भूमिका बजावली आहे. अनेक महत्त्वाच्या आणि देशहिताच्या मुद्द्यांवर त्यांनी संसदेत केंद्र सरकारला धारेवर धरले आहे.

​धारावी पुनर्विकास आणि मुंबईचे अदाणीकरण या विषयला हात घालून मुंबईच्या हितासाठी आणि धारावीकरांच्या हक्कासाठी या दोन्ही खासदारांनी संसदेत सातत्याने आवाज उठवला आहे. इतकेच नाही तर ​संविधान रक्षण या विषयावर इंडिया आघाडीच्या माध्यमातून लोकशाही आणि संविधान वाचवण्याच्या लढ्यात हे दोन्ही नेते अग्रेसर राहिले आहेत. ​महाराष्ट्रहित आणि पर्यावरण यातदेखील या दोघांनी महत्त्वाची भूमिका मांडली आहे. राज्याच्या हक्काचे प्रकल्प असोत किंवा पर्यावरणाचा ऱ्हास या विषयांवर आक्रमक मांडणी करण्यात या खासदारांचा मोठा वाटा आहे.

आमचा ठाम आग्रह
​पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या सर्व आमदारांचे असे मत आहे, की ज्या पद्धतीने हे दोन्ही खासदार दिल्लीत पक्षाची आणि राज्याची बाजू मांडत आहेत ते पाहता या दोन्ही जागा शिवसेना (ठाकरे)कडेच असणे गरजेचे आहे. संख्याबळाचा विचार करता आणि इंडिया आघाडीतील शिवसेनेचे वजन पाहता, मित्रपक्षांनीही या मागणीला पाठिंबा द्यावा, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांनी केवळ पक्षाचीच नाही, तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई दिल्लीत लढली आहे. त्यामुळे या दोन्ही जागा शिवसेनेनेच लढवाव्यात, असा आमचा ठाम आग्रह आहे. यासाठी आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्याशी चर्चा करू, असेही आदित्य ठाकरे शेवटी म्हणाले.
.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Weather: मुंबईला प्रदूषणाचा विळखा! हवेचा दर्जा खालावला; धोक्याची पातळी ओलांडल्याने आरोग्यतज्ज्ञांचं महत्त्वाचं भाकीत

Crime: लग्नाआधीच मेहंदी समारंभावेळी दोन्ही बहिणींनी जीवन संपवलं; एक तांत्रिक संबंध समोर; मृत्यूचं नेमकं गूढ काय?

बापरे! लिव्हर कॅन्सरनंतर दीपिकाच्या पोटात निघाली गाठ, अभिनेत्री व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आता मला खूप जास्त भीती...'

Sangli Miraj Crime : घरखर्चासाठी पोटच्या दोन मुलांची चाळीस हजारांत विक्री, मिरजेतील महिलेचे कृत्य; संशयित मनपाच्या रुग्णालयातील

India Brazil Trade: ब्राझीलकडून मिळणार खनिजे; संरक्षण क्षेत्रातील सहकार्यालाही आणखी बळ

SCROLL FOR NEXT