मुंबई

पंपिंग स्टेशन उभारणीला सुरुवात

CD

कुर्ला रेल्वे स्थानक-सायन रेल्वे स्थानकदरम्यान पूरमुक्ती; पंपिंग स्टेशन उभारणीला सुरुवात
मुंबई, ता. २२ ः दरवर्षी पावसाळ्यात कुर्ला रेल्वे स्थानक आणि सायन रेल्वे स्थानकदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचून वाहतूक विस्कळित होत असे. मात्र, आता ही समस्या दूर करण्यासाठी महत्त्वाच्या उपाययोजनांना सुरुवात करण्यात आली असून, हा परिसर लवकरच पूरमुक्त होणार आहे.
कुर्ला सीएसटी रोड, माहीम कॉजवे तसेच वाकोला नदी परिसरात पंपिंग स्टेशन उभारणीसह पूरनियंत्रणाची कामे प्रत्यक्षात सुरू झाली आहेत. त्यामुळे आगामी पावसाळ्यात रुळांवर पाणी साचण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पावसाळ्यात भरतीच्या काळात तसेच विहार तलाव आणि पवई तलाव येथून ओसंडून वाहणाऱ्या पाण्यामुळे लाल बहादूर शास्त्री मार्ग तसेच सायन-कुर्ला यादरम्यान रेल्वे रुळांवर दरवर्षी पाणी साचत असे. पंपिंग स्टेशन कार्यान्वित झाल्यानंतर ही कटकट कमी होण्याची अपेक्षा आहे.
पालिकेच्या अखत्यारीतील मिठी नदी प्रकल्पाचे काम दोन टप्प्यांत हाती घेण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात नदीचे १६ ते ६० मीटरपर्यंत रुंदीकरण व गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात चितळे समिती, केंद्रीय जल व विद्युत अनुसंधान संस्था तसेच आयआयटी मुंबई यांच्या अहवाल व शिफारशींनुसार मिठी नदी विकास व संरक्षण प्राधिकरणाने आराखडा तयार केला आहे.
या टप्प्यात अतिरिक्त रुंदीकरण, खोलीकरण, संरक्षक भिंती व सेवा रस्ते बांधकामाचा समावेश असून, नदीचे २० ते १०० मीटरपर्यंत रुंदीकरण करण्यात आले आहे. या उपाययोजनांमुळे पावसाळ्यातील पूरस्थितीवर नियंत्रण मिळवून रेल्वे वाहतूक सुरळीत ठेवण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT