मुंबई

म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे मार्चमध्ये ३ हजार घरांची लॉटरी

CD

म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे मार्चमध्ये तीन हजार घरांची लॉटरी
घराच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वसामन्यांसाठी मोठी संधी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : म्हाडाच्या पुणे मंडळाअंतर्गत घरांना मोठी मागणी असून, नुकत्याच काढलेल्या चार हजार २०० घरांच्या लॉटरीसाठी दोन लाखांहून अधिक अर्ज आले होते. त्या पार्श्वभूमीवर म्हाडाकडून मार्चमध्ये पुणे मंडळामधील तीन हजार घरांची लॉटरी काढली जाणार आहे. त्यामुळे म्हाडाच्या घरासाठी लॉटरीच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वसामान्यांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
म्हाडाचा विभागीय घटक पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका व पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यांतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतील ४,१८६ सदनिकांच्या विक्रीसाठी नुकतीच लॉटरी काढण्यात आली आहे. त्याला सर्वसामान्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून, दोन लाखांहून अधिक अर्ज आले होते. त्याची दखल घेत म्हाडाने पुन्हा उपलब्ध होणाऱ्या जवळपास तीन हजार घरांची लॉटरी काढण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार मार्चमध्ये लॉटरीची जाहिरात काढली जाणार असल्याची माहिती म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

काम प्रगतिपथावर
- शिरूर येथे ५७४ सदनिका व खराबवाडी येथे १९४ व्यापारी गाळे बांधण्याचे काम प्रगतिपथावर आहे.
- ताथवडे येथील फेज-१ प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. त्यानुसार पुढील फेज-२मधील ८० टक्के काम पूर्ण होऊन लवकरच ७५० निवासी व अनिवासी गाळे सोडतीत समाविष्ट करण्यात येतील.
- २० टक्के सर्वसमावेशक योजनेतून काही घरे उपलब्ध होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs ENG, T20 WC: अनपेक्षित निकाल! श्रीलंकन ढेपाळले, इंग्लडचा Super 8 मध्ये एकतर्फा विजय; पाकड्यांच्या मनात घबराट...

Buldhana Shivaji Maharaj Statue Row : चिखला गावचे फरार सरपंच Ganesh Kakad कोण? पहिल्यांदाच समोर येत व्हिडिओद्वारे दिली प्रतिक्रिया

Shikhar Dhawan चं दुसरं लग्न; रोहित शर्मा, चहलची उपस्थिती, तर विराट-रहाणेच्या कमेंटने वेधले लक्ष

SL vs ENG, T20 WC: W,W,W,W,W ! श्रीलंकेचा निम्मा संघ ३४ धावांत तंबूत; इंग्लंडच्या पार्टटाईम फिरकीपटू विल जॅक्सने वाढवली डोकेदुखी

Pune News: रुग्णांच्या जिवाशी खेळ, निकृष्ट औषधे वितरित; थेरगाव रुग्णालयातील प्रकार, तब्बल १६ हजार गोळ्यांची बॅच परत, चौकशीचे आदेश!

SCROLL FOR NEXT