मुंबई

महापालिकेचा ४३ हजार कोटींचा विकासनिधी शिल्लक ; •केवळ ५१ टक्के खर्च

CD

४३ हजार कोटींचा विकासनिधी शिल्लक
महापालिकेचा केवळ ५१ टक्के खर्च
​सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : मुंबई महापालिकेने २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात मुंबईकरांच्या नागरी सुविधांसाठी ४३ हजार १६२ कोटी रुपयांची विक्रमी तरतूद केली; मात्र आर्थिक वर्ष संपायला आता एक महिना शिल्लक असताना यातील केवळ ५१ टक्केच निधी प्रत्यक्षात खर्च झाल्याचे समोर आले आहे. प्रशासकीय राजवटीत नियोजनाचा अभाव आणि निविदा प्रक्रियेतील दिरंगाईमुळे मुंबईच्या विकासाला ‘ब्रेक’ लागला असून, हजारो कोटी रुपये अद्याप पालिकेच्या तिजोरीतच पडून आहेत.

​मुंबई महापालिकेने गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सादर केलेल्या अर्थसंकल्पात रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण, कोस्टल रोड, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि आरोग्य सुविधांवर मोठा भर दिला होता. ३१ जानेवारी २०२६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, ४३,१६२ कोटींच्या भांडवली खर्चापैकी केवळ २२,४२५ कोटी रुपये खर्च होऊ शकले आहेत. विशेष म्हणजे, रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी राखीव असलेला मोठा निधी तांत्रिक कारणांमुळे खर्च होऊ शकलेला नाही.

अधिक कामे प्रलंबित
खड्डेमुक्त रस्ते करण्यासाठी मोठी तरतूद असूनही, कंत्राटदारांवरील कारवाई आणि पुनर्निविदा प्रक्रियेमुळे ४५ टक्क्यांहून अधिक कामे प्रलंबित आहेत. आरोग्य विभागात, उपनगरीय रुग्णालयांचे सक्षमीकरण आणि औषध खरेदीसाठीचा ६० टक्के निधी अद्याप वापरला गेला नाही. शिक्षण विभागात पालिका शाळांच्या इमारतींची दुरुस्ती आणि डिजिटल क्लासरूमचे प्रकल्प निविदांच्या कचाट्यात अडकले आहेत.

फाइलींचा प्रवास सुरू
महापालिकेत मागील चार वर्षांत नगरसेवक नसल्याने प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा कोणताही वचक राहिलेला नव्हता. प्रभागातील छोट्या समस्यांसाठीही नागरिकांना थेट मुख्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. नगरसेवक असते, तर त्यांनी प्रशासनाला जाब विचारून निधी खर्च करण्यास भाग पाडले असते. मात्र, आता केवळ फाइलींचा प्रवास सुरू आहे, अशी टीका सामाजिक कार्यकर्ते ॲड. गॉडफ्रे पिमेंटा यांनी केली आहे.

आता शिल्लक असलेला ४९ टक्के निधी खर्च करण्यासाठी मार्च महिन्यात कामांचा धडाका लावला जाण्याची शक्यता आहे. मात्र, आर्थिक वर्षाच्या अखेरीस घाईघाईने बिले काढताना आणि कामे पूर्ण करताना त्यांच्या दर्जाशी तडजोड होण्याची भीती पिमेंटा यांनी व्यक्त केली आहे.
.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT