मुंबई

मुंबईत खासगी बांधकामे आठवडाभर थांबवा!

CD

मुंबईत खासगी बांधकामे
आठवडाभर थांबवा!

आदित्य ठाकरे यांचे पालिका आयुक्तांना पत्र

​सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : शहरातील हवेच्या गुणवत्तेचा स्तर भीषण पातळीवर पोहोचला आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी शहरातील सर्व खासगी बांधकामांना किमान एक आठवड्यासाठी तातडीने स्थगिती द्यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी आज मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. प्रदूषणामुळे शहराचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा स्थितीत कोणतीही गुंतवणूक किंवा पर्यटक मुंबईकडे आकर्षित होणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

​मुंबईतील प्रदूषण, खारफुटी संरक्षण आणि सार्वजनिक मैदानांच्या दुरवस्थेबाबत अत्यंत गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत.​ तीन दिवसांपासून मुंबई धुरक्याच्या विळख्यात अडकली आहे. यावर उपाय म्हणून आदित्य ठाकरे यांनी प्रत्येक प्रभागानुसार बांधकामांचे वेळापत्रक निश्चित करण्याची विनंती केली आहे. प्रदूषण कमी होईपर्यंत बांधकाम हालचालींवर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
----
मुंबई क्लायमेट वीकमध्ये मोठे दावे करणाऱ्या सरकारने आता प्रकल्पांच्या नावाखाली ४५ हजार खारफुटींची झाडे तोडण्याचा निर्णय घेणे दुर्दैवी असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे. प्रकल्प भूमिगत करून किंवा लांब स्पॅन वापरून ही झाडे वाचवता येतील. चंद्रपूरमध्ये वृक्षारोपण करण्याचा प्रस्ताव हा केवळ दिखावा आहे, अशी टीका त्यांनी केली.
​-----
बॅँक गार्डन नैसर्गिकच राहू द्या!
​कुलाबा येथील ‘बँक गार्डन’ या मातीच्या मैदानावर सिमेंटचे जंगल उभारण्यासाठी राजकीय दबाव टाकला जात असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला आहे. हे मैदान नैसर्गिक स्वरूपातच राहावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. तसेच शहरातील ज्या मैदानांचे ‘टर्फ’मध्ये रूपांतर करून सर्वसामान्यांचा प्रवेश नाकारला जात आहे, अशा सर्व संस्थांचे लेखापरीक्षण करण्याची मागणी त्यांनी पत्रात केली आहे.
​-----
भूमिगत पार्किंग कंत्राटदारांसाठी!
महालक्ष्मी रेसकोर्सवर भूमिगत पार्किंग उभारण्याचा प्रस्ताव केवळ कंत्राटदार आणि बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी आहे. कोस्टल रोडवर पार्किंगची सोय असताना करदात्यांचा पैसा कंत्राटदारांच्या घशात घालण्याचा प्रयत्न मुंबईकर सहन करणार नाहीत, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी पत्रात दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अशोक खरातच्या अत्यंत जवळच्या माणसाचा अपघाती मृत्यू; शिर्डी जमीन घोटाळ्यात होते साक्षीदार

Fake Alphonso Mango in Nipani : हापूसच्या पेटीत कर्नाटकी आंबा! बाजारात ग्राहकांची मोठी फसवणूक; 700 ते 800 रुपये दराने मिळतोय आंबा

Latest Marathi News Live Update: यवतमाळमध्ये कडक उन्हामुळे शेतातील डिस्ट्रिब्युशन बॉक्सने घेतला पेट

Pune Sugar Protest: शेतकऱ्यांचा एल्गार!घामाच्या पैशासाठी 'आरपार'ची लढाई; ३० एप्रिलपासून पुण्यातील साखर संकुलाला बेमुदत वेढा..

Success Story: ग्रामीण भागातून न्यायालयापर्यंतचा प्रवास; कल्पेश कड न्यायाधीशपदी विराजमान, जिद्द आणि मेहनतीचा विजय!

SCROLL FOR NEXT