मुंबई

एआय सायबर धोका संशोधन; एअरटेलकडून केंद्र स्थापन

CD

एआय सायबर धोका संशोधन; एअरटेलकडून केंद्र स्थापन

मुंबई, ता. २२ : क्लाऊड सुरक्षा क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी झस्केलर इनकॉर्पोरेशनने भारती एअरटेलसह एआय आणि सायबर धोका संशोधन केंद्र स्थापनेची घोषणा केली.
भारतातील सायबर वापर सहज सोपा करण्यासाठी तसेच भारतातील आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या क्षेत्रांमध्ये डिजिटल वापरकर्त्यांचे संरक्षण करण्यासाठी हे केंद्र काम करेल. भारताच्या डिजिटल परिसंस्थेमध्ये विश्वसनीय कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) स्वीकाराला गती देण्याचे कामही हे केंद्र करेल. देशाची सायबर संरक्षण प्रणाली मजबूत करणे, विकसित भारताच्या उद्दिष्टांची पूर्तता करणे, देशाला सुरक्षित आणि डिजिटलदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवणे आणि त्यासाठी कुशल मनुष्यबळ विकास विकसित करणे, हे या केंद्राच्या स्थापनेचा उद्देश आहेत. सध्या भारतात डिजिटल परिवर्तन होत असल्याने राष्ट्रीय सायबर हल्ल्याचा संभाव्य धोकाही आहे. आर्थिक हेतूने हल्लेखोर एआयचा वापर करून काही मिनिटांतच असुरक्षितता शोधून त्यांना लक्ष्य करू शकतील. त्यामुळे राष्ट्रीय आर्थिक स्थैर्यालाही धोका निर्माण होईल. त्यामुळे सक्षम डिजिटल वातावरणात राष्ट्रीय डिजिटल प्रणालीचे संरक्षण करण्यात हे केंद्र उपयुक्त ठरेल, असे भारती एअरटेलचे कार्यकारी उपाध्यक्ष गोपाल विठ्ठल म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT