मुंबई

अपडेट - महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार देशातील पहिले ‘सेंट्रल पार्क’; नागरिक-प्रशासन संवाद बैठकीत सादरीकरण

CD

महालक्ष्मी रेसकोर्सवर ‘सेंट्रल पार्क’
नागरिक-प्रशासन संवाद बैठकीत सादरीकरण
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २२ : दक्षिण मुंबईच्या हरित आणि शाश्वत विकासाला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने प्रियदर्शिनी पार्क येथे आयोजित ‘सिटीझन डायलॉग’ कार्यक्रमाला रहिवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वरळी ते कुलाबा परिसरातील ३५० हून अधिक नागरिक आणि विविध रहिवासी संघटनांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक झाली. यात महालक्ष्मी रेसकोर्स येथे उभारण्यात येणाऱ्या भारतातील पहिल्या ‘सेंट्रल पार्क’चे सादरीकरण करण्यात आले.

​साऊथ मुंबई रेसिडेंट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित या संवाद कार्यक्रमाला खासदार मिलिंद देवरा, शिवसेना प्रवक्त्या ॲड. सुशिबेन शाह आणि महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची प्रमुख उपस्थिती होती. ​आयुक्त भूषण गगराणी यांनी या वेळी रेसकोर्सवरील प्रस्तावित ‘सेंट्रल पार्क’च्या योजनेचे सादरीकरण केले. हा प्रकल्प उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील असून, दक्षिण मुंबईच्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी तो मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या जागतिक दर्जाच्या उद्यानामुळे मुंबईकरांना एक मोठा हरित पट्टा उपलब्ध होणार आहे.
​आम्ही कटिबद्ध
​केवळ सादरीकरण न करता या प्रकल्पाबाबत नागरिकांच्या शंका आणि सूचना जाणून घेण्यासाठी खुली चर्चा झाली. स्थानिक रहिवाशांनी विचारलेल्या प्रश्नांना प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला. या संवादामुळे प्रकल्पाबाबतची पारदर्शकता वाढल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. दक्षिण मुंबईचा विकास हा केवळ काँक्रीटचा नसून तो शाश्वत असावा, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. महालक्ष्मी रेसकोर्सचे रूपांतर सेंट्रल पार्कमध्ये होणे, हे या भागातील नागरिकांच्या आयुष्याचा दर्जा उंचावणारे ठरेल, असे खासदार मिलिंद देवरा यांनी सांगितले. ​या संवाद बैठकीमुळे दक्षिण मुंबईतील शाश्वत विकासाच्या प्रक्रियेत नागरिकांचा थेट सहभाग सुनिश्चित झाला आहे. आगामी काळात अशा चर्चांतून प्रकल्पांना अंतिम स्वरूप दिले जाणार असल्याचे संकेत या वेळी देण्यात आले.
.........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! Donald Trump यांच्या घरात बंदूक-इंधन कॅनसह घुसखोरीचा प्रयत्न; गुप्तहेरांच्या गोळीबारात संशयित ठार

Metro Pillar: मुंबई मेट्रो पिलर क्रॅक प्रकरण; व्हीडिओ पोस्ट करत एमएमआरडीएने दिले स्पष्टीकरण, दावे फेटाळत सत्य सांगितलं!

T20 WC, IND vs SA: बुमराह-अर्शदीपची भेदक गोलंदाजी; पण मिलर-ब्रेव्हिसच्या जोडीनं द. आफ्रिकेला तारलं; भारतासमोर मोठं लक्ष्य

Pune Crime: दौंडमध्ये ८०५ लीटर गावठी दारू जप्त; राज्य उत्पादन शुल्कची कारवाई, पाेलिसांचा संशय बळावला अन्..

Karad Crime: कऱ्हाडनजीक तीन बांगलादेशी घुसखोरांना अटक; मुढेगावात सहा महिन्यापासून वास्तव्य, बनावट आधारकार्ड अन् बरच काही..

SCROLL FOR NEXT