मुंबई

मुंबई-मिरा भाईंदर प्रवास होणार अधिक वेगवान

CD

मुंबई-मिरा भाईंदर प्रवास होणार अधिक वेगवान
दहिसर-भाईंदर उन्नत मार्गासाठी सल्लागार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २३ : महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडच्या विस्तारीकरणाला आता अधिक वेग येणार आहे. दहिसर (पश्चिम) ते भाईंदर (पश्चिम) या दरम्यानच्या ४५ मीटर रुंद उन्नत मार्गाच्या (एलिव्हेटेड रोड) बांधकामावर देखरेख ठेवण्यासाठी पालिकेने आता प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. या कामासाठी स्वारस्य असलेल्या कंपन्यांकडून निविदा मागवण्यात आल्या आहेत.
​दहिसर आणि भाईंदर या दोन शहरांमधील वाढती वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हा उन्नत मार्ग अत्यंत कळीचा ठरणार आहे. या मार्गाची काही प्रमुख वैशिष्ट्येदेखील आहेत. हा उन्नत मार्ग ४५ मीटर रुंद असेल, ज्यामुळे वाहनांची ये-जा सुलभ होईल. हा मार्ग मुंबई कोस्टल रोडच्या उत्तर टोकाला थेट भाईंदरशी जोडला जाईल. सध्या दहिसर चेकनाका आणि अंतर्गत रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचा वेळ या मार्गामुळे ५० टक्क्यांहून अधिक वाचण्याची शक्यता आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणावरील पायाभूत सुविधांच्या कामात पारदर्शकता आणि गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी सल्‍लागाराची भूमिका महत्त्वाची असते. निविदा प्रक्रियेनुसार निवडलेला सल्लागार मार्गाचे डिझाइन तपासणे, बांधकामाच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवणे आणि प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण होईल याची खात्री करणे या जबाबदाऱ्या पार पाडेल.
​महापालिकेने या कामासाठी विशेष स्वारस्य दाखवले असून, २३ फेब्रुवारीपर्यंत ही निविदा सादर करण्याची अंतिम तारीख निश्चित केली होती. निविदा सादर करण्याची मुदत संपल्याने आता पुढे तांत्रिक आणि आर्थिक बाबींची पडताळणी केल्यानंतर पात्र कंपनीची निवड केली जाईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला गती मिळेल.

लाखो प्रवाशांना दिलासा
दहिसर-भाईंदर उन्नत मार्ग हा केवळ एक रस्ता नसून, तो उत्तर मुंबई आणि मिरा-भाईंदरमधील लाखो प्रवाशांसाठी एक मोठा दिलासा ठरणार आहे. या सल्लागार नेमणुकीनंतर प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला वेग येईल, असे महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.​ या प्रकल्पामुळे केवळ प्रवासाचा वेळच वाचणार नाही, तर इंधनाची बचत होऊन पर्यावरणावरील ताणही कमी होण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: ''..तोपर्यंत मी शर्टचं वरचं बटण लावणार नाही'', विधानसभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

भाजपच नाही, सोनिया गांधींनीही शब्द दिला होता! २०२७ पूर्वी विदर्भ वेगळा होणार, विदर्भ राज्य आंदोलन समितीने व्यक्त केला विश्वास

आम्ही आमचं बाळ गमावलं... लोकप्रिय मराठी इन्फ्लूएन्सर कपलला धक्का; म्हणाले- ५ व्या महिन्यात समजलं की...

Meat And Fish Ban: मांस आणि माशांच्या खुल्या विक्रीवर बंदी! आता परवानगी असेल तरच दुकान चालणार; राज्य सरकारची मोठी घोषणा

Mumbai: मुंबईतील हवा ‘भीषण’ स्तरावर; बांधकामांना आठवडाभर स्थगितीची मागणी; पालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात काय लिहिलंय?

SCROLL FOR NEXT