मुंबई

‘ॲडव्हान्स स्कीम’अंतर्गत म्हाडाची ३,५०० घरे

CD

‘ॲडव्हान्स स्किम’अंतर्गत म्हाडाची ३,५०० घरे
येत्या लॉटरीत होणार समावेश

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : आतापर्यंत तयार घरांची लॉटरी काढणारे म्हाडा आता ॲडव्हान्स काँट्रिब्युशन स्किमअंतर्गत घरे उभारणार आहे. त्यामध्ये गोरेगाव पत्रा चाळ, विक्रोळी कन्नमवारनगर आणि प्रतीक्षानगर या तीन ठिकाणी तब्बल ३,५०० घरे असणार आहेत.
म्हाडाकडून लवकरच काढल्या जाणाऱ्या लॉटरीत या घरांचा समावेश केला जाणार आहे. ही घरे असलेल्या प्रकल्पांना आवश्यक सर्व परवानग्या मिळाल्या असून, प्राथमिक स्तरावर काम सुरू झाले आहे. सध्या ज्या इमारतींची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत त्या घरांचा लॉटरीत समावेश केला जातो. पण म्हाडाकडे मुंबईत पुरेशी तयार घरे उपलब्ध नाहीत. त्यामुळे मार्च-एप्रिलमध्ये मुंबई मंडळाकडून काढल्या जाणाऱ्या लॉटरीत ॲडव्हान्स काँट्रिब्युशन स्किमअंतर्गत उभारल्या जाणाऱ्या घरांचा समावेश असणार आहे. गोरेगाव पत्रा चाळ येथे २,९५० घरे असणार आहेत. त्यामध्ये उच्च उत्पन्न गटासाठीची २५० घरे असणार आहेत. मध्यम उत्पन्न गटाची १,७०० तर अल्प उत्पन्न गटाची घरे १,००० घरे असणार आहेत. कन्नमवारनगर आणि प्रतीक्षानगर येथे ६०० घरे असणार असून, त्यामध्ये बहुतांश घरे मध्यम उत्पन्न गटातील असणार आहेत. दरम्यान, या घरांची लॉटरी काढल्यानंतर विजेत्यांना पुढील तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने घराचे पैसे भरता येणार आहेत.
...
कोठे, किती घरे?
गोरेगाव पत्रा चाळ - २,९५०
कन्नमवारनगर आणि प्रतीक्षानगर - ६००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी काम बंद आंदोलन करणार! शासनाविरोधात तीव्र भूमिका; का आणि कधीपासून?

खुर्चीला बांधलं अन् तोंडावर टेप लावली; लोकप्रिय अभिनेत्रीच्या वडिलांची हत्या; पर्यटक बनून आले आणि...

नागपूरकरांनो लक्ष द्या! राष्ट्रपतींच्या दौऱ्यादरम्यान शहरातील वाहतुकीत होणार बदल, 'हे' असतील पर्यायी मार्ग

रेवतीचं लग्न झालं म्हणून मुद्दाम पोस्ट केलीस का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर संतापला आदीश वैद्य; म्हणतो- तिला प्रेम मिळालं म्हणून...

Agricultural: पारंपरिक शेतीला पर्याय! कृषी क्षेत्रात ‘बिजली’ फुलांची क्रांती; शेतकऱ्यांसाठी कमाईचा नवा मार्ग

SCROLL FOR NEXT