मुंबई

महाराष्ट्र राज्य सहकारी संघ देणार दर्जेदार प्रशिक्षण

CD

महाराष्ट्र राज्य सहकारी संघ देणार दर्जेदार प्रशिक्षण
मुंबई, ता. २३ : महाराष्ट्र राज्यातील सहकारी संस्थांना व कार्यकर्त्यांना अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज असे दर्जेदार प्रशिक्षण देणार असल्याची भूमिका महाराष्ट्र राज्य सहकारी संघाने घेतली आहे.

नुकतीच राज्य सहकारी संघाच्या संचालक समितीची सभा पुणे येथे झाली. सध्याच्या स्पर्धेत टिकायचे असेल व राज्यातील सहकार प्रशिक्षित करायचा असेल, तर दर्जेदार प्रशिक्षण देण्याची आवश्यकता असल्याने या संबंधातील परिपूर्ण यंत्रणा उभारण्याचा निर्णय झाला. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या सर्व मालकीच्या जागांचे विधिवत सर्वेक्षण करून न्यायालयातील प्रलंबित खटले निकाली काढून संघाला आपल्या जागा ताब्यात ठेवून संघाचा विकास व आर्थिक सक्षमता वाढविण्याचा निर्णयही झाला. नाममात्र दरात भाड्याने दिलेल्या जागांवरही पुनर्विचार करण्याचे ठरले. तसेच महाराष्ट्र राज्य सरकारकडे पूर्वी सुरू असणारे शिक्षण अनुदान मागण्याकरिता विनंती करण्याचेही संचालक मंडळाच्या सभेत ठरले.

सदर संचालक मंडळाच्या सभेत राज्य सहकारी संघाचे उपाध्यक्ष अर्जुनराव बोरुडे, ज्येष्ठ संचालक संजय कुसाळकर, शिवाजीराव नलावडे, नंदकुमार काटकर, अशोक जगताप यांसह राज्यभरातील इतर संचालक मान्यवर उपस्थित होते.

मासिकाचा दर्जा वाढणार
सध्या फक्त सहकारी संस्थांच्या कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे सहकारी महाराष्ट्र हे मासिक नव्याने दर्जा व व्याप्ती वाढवून प्रकाशित करण्याचे ठरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

Latest Marathi News Live Update : जेव्हा कधी काहीतरी चांगले घडते, तेव्हा विरोधक तक्रारी करतातच, नारी शक्ती वंदन विधेयकावर कंगना रानौत यांची प्रतिक्रिया

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकचे शतक, मोडला MS Dhoni चा विक्रम! युझवेंद्र चहलची एक चूक अन् पंजाब किंग्सच्या मेहनतीवर पाणी

Aarey Milk: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ‘आरे’ दूध पुन्हा बाजारात येणार, तारीख आली समोर, स्टॉलधारकांना दिलासा

SCROLL FOR NEXT