मुंबई

राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांना वेग; ३१ मार्च २०२६ पर्यंत उद्दिष्टपूर्तीसाठी विशेष मोहीम

CD

राष्ट्रीय आरोग्य मोहिमांना गती
राज्यात उल्लेखनीय प्रगती; उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने वाटचाल

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २६ (बातमीदार) : महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागमार्फत राज्यात विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम अभियान स्वरूपात राबविले जात आहेत. दरम्यान, ३१ मार्च २०२६ पर्यंत उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी विशेष मोहिमांना गती देण्यात आली आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या निर्देशानुसार या उपक्रमांत महत्त्वपूर्ण प्रगती नोंदविण्यात आली आहे.
‘अरुणोदय’ सिकलसेल अभियानांतर्गत १५ जानेवारीपासून २१ जिल्ह्यांत शून्य ते ४० वयोगटातील ४० लाख पाच हजार ७५० नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, एक हजार ६३ रुग्ण व १७ हजार ६७९ वाहक आढळले आहेत. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधीत ३३४ हृदय शस्त्रक्रिया व २,२४० इतर शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या. तीव्र रक्तक्षय असलेल्या चार हजार ३७२ गरोदर मातांची तपासणी करून तीन हजार ९६३ मातांना आयर्न सुक्रोज किंवा फेरिक कार्बोक्सी माल्टोज उपचार देण्यात आले. हत्तीरोग निर्मूलन मोहिमेत ९९३ पात्र रुग्णांपैकी ६०८ शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या; गडचिरोलीत २१०, तर चंद्रपूरमध्ये १३० रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली.
क्षयरोगमुक्त भारत अभियानांतर्गत राज्यात ३६ हजार ५०७ निक्षय मित्र नोंदणीकृत असून, एक लाख ५७ हजार १७३ रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यापैकी २२ हजार २०१ रुग्णांना अन्नधान्य किट वितरित करण्यात आले. कुष्ठरोग प्रतिबंध मोहिमेत १६ हजार ७६१ रुग्ण नोंदले गेले असून, चार लाख ४७ हजार २९६ सहवासितांपैकी तीन लाख २५ हजार ४६० जणांना प्रतिबंधात्मक उपचार देण्यात आले.
-------
सक्रिय सहभागाचे आवाहन
असंसर्गजन्य रोग तपासणीत नऊ लाख ४१ हजार ६७४ नागरिकांची उच्च रक्तदाब व आठ लाख ५० हजार ८५७ नागरिकांची मधुमेह तपासणी करण्यात आली असून, अनुक्रमे ६२ हजार ६९३ व ३६ हजार ३२७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नागरिकांनी तपासणी व उपचारांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: आफ्रिकेच्या विजयाने टीम इंडियाचा भार हलका केला! झिम्बाब्वेविरुद्ध संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करून उतरला

Baramati News : बारामती नगरपरिषदेच्या पहिल्याच बैठकीत नगरसेवक आक्रमक...

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांनी स्वीकारली राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी

Pachod Theft : चोरट्यांनी बनविले शेतकऱ्यांना 'लक्ष्य'! पाणी असूनही पिकांची होरपळ; दोनशेवर शेतकऱ्यांच्या विद्यूत पंपाचे केबल रात्रीतून लंपास

T20 WC, SA vs WI: दक्षिण आफ्रिकेचे सेमीफायनलच्या दिशेने पाऊल; वेस्ट इंडिजला हरवून भारतासाठीही उघडलीत दारं

SCROLL FOR NEXT