मुंबई

अत्यावश्यक औषधांचा तात्पुरता तुटवडा

CD

अत्यावश्यक औषधांचा तात्पुरता तुटवडा

उपनगरांतील शासकीय रुग्णालयांतील स्थिती

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : उपनगरांतील काही शासकीय रुग्णालयांत अत्यावश्यक औषधांचा तात्पुरता तुटवडा जाणवत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. कूपर रुग्णालयात काही औषधांचा साठा मर्यादित असल्याचे समजते. त्यामुळे रुग्णांना बाहेरील औषध दुकानांतून औषधे खरेदी करावी लागत आहे. रुग्णालय प्रशासनाकडून लवकरच आवश्यक औषधांचा पुरवठा सुरळीत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी संबंधित विभागाकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

केफिक्सिमी, फ्लुकॉनझोल यांसारखी अँटिबायोटिक व अँटी-फंगल औषधे, तसेच लेबटलोल, अटेनॉलॉल, रॅमप्रिल ही उच्च रक्तदाब नियंत्रणासाठीची औषधे काही दिवसांपासून अपुरी आहेत. याशिवाय आयसोसॉरबाइड नायट्रेट, अटोरव्हास्टॅटिन यांसारखी हृदयरुग्णांसाठीची औषधे, ट्रॅनेक्सामिक ॲसिड आणि डायक्लो-पॅरासिटामॉल यांचाही साठा मर्यादित असल्याचे सांगितले जाते. ही औषधे हृदयरुग्ण, उच्च रक्तदाब असलेले रुग्ण आणि संसर्गग्रस्त रुग्णांच्या उपचारात नियमित वापरली जातात.

बाजारातही काही औषधांची मागणी वाढली आहे. इन्फ्लुएन्झावरील टॅमिफ्लू, त्वचारोगांवरील सॅलिसिलिक ॲसिड मलम, व्हायरल संसर्गांवरील असायक्लॉवीर तसेच वेदनाशामक डायक्लोफेनाक आणि ब्रुफेन यांची उपलब्धता काही भागांत मर्यादित असल्याचे सांगितले जाते. उत्पादनातील तांत्रिक अडचणी आणि वाढती मागणी यामुळे तात्पुरती समस्या निर्माण झाल्याचे खासगी औषध विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

याबाबत रुग्ण अभिषेक पांडे म्हणाले, ‘काही दिवसांपूर्वी कूपर रुग्णालयात औषध न मिळाल्याची तक्रार केली होती. मात्र इतर रुग्णांनाही औषधे नियमित मिळत आहेत का, हे प्रशासनाने तपासले पाहिजे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी त्यांची खाती इतर मंत्र्यांकडे सोपवली; मोठं कारण आलं समोर, पडद्यामागे नेमकं काय घडलं?

T20 WC, WI vs ZIM: ७ चौकार, ७ षटकार... वानखेडेवर हेटमायरचं वादळ; झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना झोडपत विंडीजसाठी रचला वर्ल्डरेकॉर्ड

IND vs SA: अरे बॉल दे ना... ! अहमदाबादमध्ये द. आफ्रिकेचा खेळाडू चाहत्यांवर भडकला; Video Viral

बेकायदा इमारत होणार भुईसपाट! उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाचा पवित्रा; नेमकं प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : सोलापूरात अवकाळी पावासाची जोरदार हजेरी

SCROLL FOR NEXT