फेब्रुवारीच्या वेतनासोबत
थकबाकीचा हप्ता
परिवहनमंत्री सरनाईक यांचे आश्वासन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : राज्यात ‘लालपरी’ला जिवंत ठेवणाऱ्या ८६ हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या थकीत आर्थिक देणी मिळालीच पाहिजेत, असे परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. धुलिवंदनापूर्वी फेब्रुवारीच्या वेतनासोबत हप्ता देण्याचे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.
महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांच्या पुढाकाराने आयोजित रक्तदान शिबिरास सरनाईक यांनी भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी आमदार भाई जगताप, माजी परिवहनमंत्री दिवाकर रावते तसेच एसटीचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरनाईक म्हणाले की, पहिल्या टप्प्यात शासनाने १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. उर्वरित रक्कमही लवकरच मिळेल. त्यामुळे यापुढे प्रत्येक महिन्याच्या वेतनाबरोबर थकीत वेतनवाढीचा हप्ता देणे शक्य होणार आहे.
थकीत देणी, वेतनवाढीचा हप्ता आणि कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी घेतलेले निर्णय हे केवळ आर्थिक उपाय नसून, एसटी कर्मचाऱ्यांच्या श्रमाचा सन्मान आहे. कर्मचाऱ्यांचा विश्वास आणि जनतेचा आधार हेच एसटीचे खरे भांडवल आहे, असेही प्रताप सरनाईक म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.