मुंबई

कर न भरल्यास थेट लिलाव

CD

कर न भरल्यास थेट लिलाव
३७८ कोटींच्या वसुलीसाठी २१ दिवसांची अंतिम मुदत
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २४ : मालमत्ता कर थकविणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांविरोधात महापालिकेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. वारंवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्या १२ बड्या थकबाकीदारांच्या मालमत्तांची ई-लिलाव प्रक्रिया पालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याने सोमवार (ता.२३) पासून सुरू केली आहे. या मालमत्तांवर तब्बल ३७८ कोटी ६३ लाख ६७ हजार ५५७ रुपयांची थकबाकी प्रलंबित आहे.
या मोहिमेत १० मोकळे भूखंड, एक व्यावसायिक इमारत आणि एक संमिश्र वापराच्या मालमत्तेचा समावेश आहे. संबंधित मालमत्ताधारकांना कर भरण्यासाठी २१ दिवसांची दीर्घ नोटीस बजावण्यात आली आहे. या मुदतीत कराचा भरणा न केल्यास जप्तीनंतर थेट लिलावाद्वारे वसुली केली जाणार आहे.
अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी स्पष्ट केले की, ज्या थकबाकीदारांकडे आर्थिक क्षमता असूनही कर भरण्यास टाळाटाळ केली जात आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई सुरूच राहील. आयुक्तांच्या आदेशानुसार ही मोहीम एच-पश्चिम, एस, आर-दक्षिण आणि ई विभागात तीव्र करण्यात आली आहे. विहित मुदतीत कर भरणा न झाल्यास, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रथम मालमत्तेतील चीजवस्तू जप्त केल्या जातील. त्यानंतरही वसुली न झाल्यास मालमत्तेचा लिलाव करून पालिकेचा महसूल वसूल केला जाईल, असे पालिकेने नोटिशीद्वारे स्पष्ट केले आहे.

कोणाकडे किती थकबाकी?
•​मेसर्स सुमेर असोसिएट्स (एच पश्चिम) : १८८ कोटी ४६ लाख रुपये.
•​मेसर्स राजहंस असोसिएट्स (भांडुप) : ४७ कोटी २ लाख रुपये (व्यावसायिक इमारत).
•​श्री. मुल्ला गुलाम अली (रे रोड) : ८५ कोटी ३८ लाख रुपयांसह ३ वेगवेगळे भूखंड.
•​सेंट पीटर्स चर्च (वांद्रे) : १२ कोटी ६४ लाख रुपये (भूखंड).
•​एल्को आर्केड सोसायटी (खार) : ९ कोटी ७६ लाख रुपये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

“त्यांच्यासोबत काम मास्टरक्लाससारखं वाटायचं" अक्षय कुमारने दिला असरानी यांच्या आठवणींना उजाळा ; भूतबंगला सिनेमात केलं अखेरचं काम

शुक्राच्या वृषभ राशीतील संक्रमणामुळे तयार होतोय पंचमहापुरुष राजयोग ! कोणत्या राशींना होणार फायदा घ्या जाणून

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT