मुंबई

केईएममध्ये ‘मा आयव्हीएफ’ केंद्र सुरू

CD

केईएममध्ये ‘मा आयव्हीएफ’ केंद्र सुरू
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्‍घाटन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : केईएम रुग्णालयात ‘मा आयव्हीएफ’ उत्कृष्टता केंद्राचे उद्‍घाटन सोमवारी राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि महापौर रितू तावडे यांच्या हस्ते झाले.
हे केंद्र संपूर्णपणे पालिकेचे असून, यासाठी दोन कोटी खर्च करण्यात आला आहे. डॉ. अंजली मालपाणी आणि डॉ. अनिरुद्ध मालपाणी यांनी यासाठी सुमारे ७५ लाखांच्या मशिनरी उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे वंध्यत्वावरील आयव्हीएफ उपचार खासगी क्षेत्राच्या तुलनेत सुमारे ५० टक्के कमी दरात उपलब्ध होणार आहेत.
दरवर्षी ५०० ते ६०० रुग्णांना सेवा देण्याची क्षमता असलेले हे केंद्र मध्यम व अल्प उत्पन्न गटातील दाम्पत्यांसाठी परवडणारा पर्याय ठरेल. तसेच वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण व संशोधनासाठीही हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे. ४० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या सेवेचे पुनरुज्जीवन करत, केईएममधील हे केंद्र शासकीय रुग्णालयांसाठी आयव्हीएफ उपचाराचे मार्गदर्शक मॉडेल ठरणार आहे.

महापौर रितू तावडे यांनी हा क्षण मुंबईच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी अभिमानास्पद असल्याचे सांगितले. आयव्हीएफ उपचार हे खर्चिक मानले जातात. मात्र, केईएम रुग्णालयात आता ही सुविधा माफक दरात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मध्यम व अल्प उत्पन्न गटातील दाम्पत्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अपत्य प्राप्तीची इच्छा असलेल्या हजारो कुटुंबांसाठी हे केंद्र आशेचा किरण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘गुरुदक्षिणा’ म्हणून केंद्र उभारले
सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेले हे केंद्र सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर उभारले आहे. केईएममध्ये वैद्यकीय शिक्षण घेतलेले डॉ. अंजली मालपाणी आणि डॉ. अनिरुद्ध मालपाणी यांनी आपल्या संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत ‘गुरुदक्षिणा’ म्हणून हे केंद्र उभारले आहे.
स्त्रीरोग विभागात ४० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या कृत्रिम गर्भधारणा सेवेचे पुनरुज्जीवन या केंद्रामुळे झाले आहे. तसेच, वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षणाची उत्कृष्ट संधी उपलब्ध होणार आहे. भविष्यात संशोधन व मार्गदर्शक तत्त्वे विकसित करून शासकीय रुग्णालयांसाठी हे केंद्र दिशादर्शक ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT