मुंबई

उच्च रक्तदाब बनतोय साइलेंट किलर,

CD

उच्च रक्तदाबासाठी नवी उपचार पद्धती
परळमध्ये अत्याधुनिक ‘रेनल डेनरव्हेशन थेरपी सेंटर’ सुरू

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २५ : उच्च रक्तदाबाच्या उपचारांसाठी आणि अनेक औषधे घेतल्यानंतरही रक्तदाब नियंत्रणात न येणाऱ्या रुग्णांसाठी अत्याधुनिक ‘रेनल डेनरव्हेशन थेरपी सेंटर’ची सुरुवात परळ येथील ग्लेनईगल्स रुग्णालय येथे करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी रुग्णालयाने मेडट्रॉनिक इंडियासोबत हातमिळवणी केली आहे.

उच्च रक्तदाब हा ‘सायलेंट किलर’ ठरत असून, तज्ज्ञांच्या माहितीनुसार भारतातील प्रत्येक तिसरी व्यक्ती या आजाराने ग्रस्त आहे. किडनी, हृदय आणि मेंदूवर होणाऱ्या दुष्परिणामांचा धोका कमी करण्यासाठी रेनल डेनरव्हेशन थेरपी उपयुक्त ठरणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागामार्फत केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १ जानेवारी २०२६ ते १७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ९,४१,६७४ नागरिकांची उच्च रक्तदाबासाठी तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ६२,६९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नव्या केंद्रात सखोल तपासणी, समुपदेशन, औषधांचे योग्य नियोजन आणि पात्र रुग्णांसाठी रेनल डेनरव्हेशन थेरपी उपलब्ध असेल. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
यासंदर्भात संचालक व हृदयरोगतज्ज्ञ डॉ. राहुल गुप्ता म्हणाले, रेझिस्टंट हायपरटेन्शन हा आजार अनेकदा लक्षणांशिवाय वाढतो आणि अत्यंत धोकादायक ठरतो. निवडक रुग्णांसाठी रेनल डेनरव्हेशन थेरपी हा प्रभावी अतिरिक्त उपचार पर्याय आहे. नेफ्रोलॉजिस्ट डॉ. भरत शाह यांनी सांगितले की, अनियंत्रित उच्च रक्तदाबाचा परिणाम मूत्रपिंडांवर गंभीर स्वरूपात होऊ शकतो. या केंद्रामुळे उच्च जोखमीच्या रुग्णांना बहुवैद्यकीय उपचार देता येतील. तज्ज्ञांच्या मते, या नव्या सुविधेमुळे उच्च रक्तदाब व्यवस्थापनात महत्त्वाची भर पडणार असून, रुग्णांना अधिक सुरक्षित व प्रभावी उपचारपर्याय उपलब्ध होणार आहेत.
---------------
निदानास होणारा विलंब आणि नियमित फॉलो-अपचा अभाव ही मोठी आव्हाने आहेत. मेडट्रॉनिकसोबतच्या सहकार्यामुळे अधिक नियोजनबद्ध आणि अचूक उपचार शक्य होती.
- डॉ. बिपीन चेवले, मुख्य कार्यकारी अधिकारी

रेसिस्टंट हायपरटेन्शन ही वाढती व दुर्लक्षित समस्या आहे. जनजागृती, अचूक निदान आणि संरचित उपचार पद्धती विकसित करणे गरजेचे आहे.
- मनदीप सिंग कुमार, व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष, मेडट्रॉनिक इंडिया

महत्त्वाचे मुद्दे :
ग्लेनईगल्स रुग्णालय येथे रेनल डेनरव्हेशन थेरपी सेंटर सुरू
औषधांनी न नियंत्रणात येणाऱ्या उच्च रक्तदाबासाठी विशेष उपचार
हृदयरोगतज्ज्ञ-नेफ्रोलॉजिस्ट संयुक्त टीम
रुग्ण शिक्षण, जीवनशैली सुधारणा व नियमित फॉलो-अप
हृदयविकार, स्ट्रोक व किडनी निकामी होण्याचा धोका कमी करण्यावर भर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: ब्रेकअप ही सामान्य बाब; प्रेमसंबंध तुटणे म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त करणे नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Thane News: मलंगगड फ्युनिक्युलरवरून नवा वाद! ‘ऑपरेटिंग सिस्टीम’ बेजबाबदार व्यक्तीकडे? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार

Palus Municipal Council : पलूस पालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय; पाणी योजनेला मुदतवाढ, स्मशानभूमी दुरुस्तीला हिरवा कंदील

Jalgaon Smart Meter : जळगावकरांना महावितरणचा डिजिटल 'शॉक'! थकबाकीदारांची वीज आता परस्पर होणार खंडित

BMC Budget: मोफत स्टेशनरी, पदवीपर्यंत फी भरण्याची तरतूद अन्...; बीएमसीचा ₹४,२४८ कोटींचा शिक्षण अर्थसंकल्प सादर, योजना काय आहेत?

SCROLL FOR NEXT