मुंबई

लॉरेन्स बिश्नोईच्या नावे मुंबईत धमकी सत्र

CD

लॉरेन्स बिश्नोईच्या नावे मुंबईत धमकी सत्र
दोन आठवड्यांत तीन सराफा व्यावसायिकांना खंडणीसाठी धमक्या

मुंबई, ता. २४ : कुख्यात लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या टोळीचे नाव वापरून मुंबईतील व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकी सत्र सुरू झाले आहे. गेल्या दोन आठवड्यांत पश्चिम उपनगरातील तीन सराफा व्यावसायिकांना ब्रिटनच्या सीम कार्डवरून धमक्या प्राप्त झाल्या आहेत, त्यातील एका प्रकरणात मुंबई, झारखंडवरून आरोपींना अटक करण्यात आली. अन्य दोन प्रकरणांचा तपास सुरू आहे.

पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या गुन्ह्याची बिश्नोई किंवा त्याच्या टोळीचा काहीही संबंध नाही. आरोपींनी फक्त त्याच्या नावाचा वापर केला आणि धमकावण्यासाठी परदेशी सीम कार्ड वापरले. विलेपार्ले येथील सराफा व्यावसायिकाला १२ फेब्रुवारीपासून +४४ या ब्रिटनचा संकेतांक (कंट्री कोड) असलेल्या मोबाईल क्रमांकावरून २० लाखांच्या खंडणीसाठी धमकीचे मेसेज आणि कॉल प्राप्त झाले. समोरून बोलणाऱ्याने व्यावसायिकाला बिश्नोई टोळीतर्फे बोलत असल्याचे भासवले, पुढे खंडणीची रक्कम पाच लाख ठरली. लोकमान्य टिळक टर्मिनस येथे ती स्वीकारण्यासाठी आलेल्या चौघांना तर झारखंडच्या धनबाद शहरातून एकाला विलेपार्ले पोलिसांनी अटक केली, तर १८ ते २० फेब्रुवारीदरम्यान बोरिवली येथील सराफा व्यावसायिकाला ३० लाखांच्या खंडणीसाठी बिश्नोई टोळीचे नाव वापरून +४४ संकेतांक आलेल्या मोबाईल क्रमांकावरून धमकावण्यात आले. ‘खंडणी नाही दिली, तर तुझाही बाबा सिद्दीकी करू,’ असे सांगण्यात आले; मात्र संबंधित व्यापाऱ्याने न डगमगता बोरिवली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्या गुन्हा नोंदवण्यात आला. दरम्यान, अशाच स्वरूपाचा गुन्हा अंधेरीच्या डी. एन. नगर पोलिस ठाण्यातही दाखल झाला आहे.

धमकीसत्रामागे एकच टोळी
धमकीच्या तिन्ही गुन्ह्यांमध्ये एकाच सिम कार्डच्या आधारे व्यापाऱ्यांना धमकावण्यात आले आहे. माहितीच्या आधारे विलेपार्ले पोलिसांनी झारखंडमधील धनबाद येथे कारवाई केली, तेव्हा प्रमुख आरोपी निसटला; मात्र त्याचा साथीदार पथकाच्या हाती लागला. अन्य विलेपार्लेसह बोरिवली आणि डी. एन. नगर पोलिस मुख्य आरोपीच्या शोधात आहेत.

जामतारा कनेक्शन?
खंडणीच्या गुन्ह्यांमागे झारखंडमधील जामतारा गावातील एखादी संघटित सायबर गुन्हेगारी टोळी असावी, असा संशय पोलिसांना आहे. गुगलआधारे मुंबईतील व्यावसायिकांचे संपर्क क्रमांक शोधून त्यांना बिश्नोई टोळीच्या नावे धमकावून पैसे उकळण्याची ही नवी पद्धत असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

Ajit Pawar Plane Crash: 'व्हीएसआर'च्या विमान उड्डाणांवर बंदी; बारामती विमान अपघात प्रकरणी DGCAची मोठी कारवाई

Pune Crime : बारावीचा पेपर संपताच कोथरूडमध्ये विद्यार्थ्यावर कोयत्याने वार; दोन अल्पवयीन ताब्यात

Fruit Drink Maaza: 'माझा'च्या छोटा पॅकमध्ये आढळली घाण; ११ वर्षीय मुलाची प्रकृती बिघडली

Kukadi Project : कुकडी प्रकल्पातून उन्हाळी पहिल्या आवर्तनात 7.6 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय

SCROLL FOR NEXT