मुंबई

भारतातील टायर बाजारात बीकेटीचा प्रवेश

CD

भारतातील टायर बाजारात बीकेटीचा प्रवेश

मुंबई, ता. २५ : बाळकृष्‍ण इंडस्‍ट्रीज लि. (बीकेटी) या ऑफ-हायवे टायर (ट्रॅक्टर, खाणीतले ट्रक इ.) विभागातील जागतिक अग्रणी कंपनीने आज सामान्य वाहनांचे (ऑन-हायवे) टायर आणून भारतातील ग्राहक टायर बाजारपेठेत प्रवेशाची घोषणा केली.
आपल्‍या व्यवसायाचा धोरणात्‍मक विस्‍तार करत बीकेटीने दुचाकी आणि व्यापारी वाहनांसाठी तयार केलेली उत्‍पादने सादर केली. यासोबत कंपनीने रणवीर सिंह ब्रँड ॲम्‍बेसेडर असलेली आपली राष्‍ट्रीय ब्रँड मोहीम ‘एलीव्‍हेट युअर ड्राइव्‍ह’देखील सुरू केली. बीकेटीचे अध्‍यक्ष आणि व्‍यवस्‍थापकीय संचालक अरविंद पोद्दार, बीकेटीचे संयुक्त व्‍यवस्‍थापकीय संचालक राजीव पोद्दार, बीकेटीच्‍या व्‍यवसाय विकास व धोरणाचे वरिष्‍ठ अध्यक्ष व संचालक सतिश शर्मा, बीकेटी युरोपचे व्यवस्थापकीय संचालक लुसिया साल्‍मासो आणि बीकेटी टायर्सचे भारतातील चीफ मार्केटिंग ऑफिसर महेश कोप्‍पड यांच्‍या उपस्थितीत ही घोषणा करण्‍यात आली.
भारतातील ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करणे तसेच सुरक्षितता, विश्वसनीयता आणि मूल्‍य देणारे टायर सादर करणे यातून आमचे ग्राहक, वितरक आणि विक्रेत्यांसाठी विश्वासार्ह सहयोगी बनण्‍याचा आमचा निर्धार आहे, असे बीकेटीचे अध्‍यक्ष आणि व्‍यवस्‍थापकीय संचालक अरविंद पोद्दार म्‍हणाले. आर्थिक वर्ष २०२५ मधील महसूलाच्‍या तुलनेत २.२ पट वाढीसह सन २०३० पर्यंत २३,००० कोटी रूपये महसूल संपादित करण्‍यात आम्ही यशस्वी होऊ, असे बीकेटीचे संयुक्त व्‍यवस्‍थापकीय संचालक राजीव पोद्दार म्‍हणाले. या टायरमुळे दुचकी, ट्रक, बस, टेम्पो या श्रेणींमध्ये टिकाऊपणा, इंधमाचा कमी खप, आरामदायी प्रवास व जास्त कार्यक्षमता मिळेल. आम्ही सन २०३० पर्यंत पाच टक्के बाजारवाटा मिळवू, असे बीकेटीचे वरिष्‍ठ अध्‍यक्ष व संचालक सतिश शर्मा म्‍हणाले. या विस्तारासाठी कंपनीने साडेतीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
आज बाजारात आणलेल्या बीकेटी झेनोव्‍हा टायरमुळे शहरातील दैनंदिन प्रवाशांना अधिक आरामदायीपणा, सुलभ हाताळणी व उत्तम पकड मिळते. या श्रेणीच्या टायरचे डिझाइन, पडताळणी, गतीशील टिकाऊपणा चाचण्‍या इंदूरमधील सरकारी चाचणी केंद्रावर झाल्या. तर नॅट्रक्‍स येथे ही टायर लावलेल्या गाडीची चाचणी, तसेच ओल्‍या व सुक्‍या पृष्‍ठभागांवर ब्रेक, प्रवासाचा दर्जा, हाताळणी व कार्यक्षमता यासंदर्भात प्रखर मूल्‍यांकन करण्‍यात आले आहे. या उत्‍पादनांनी बीआयएस दर्जा मिळवला आहे, असेही आज सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: ब्रेकअप ही सामान्य बाब; प्रेमसंबंध तुटणे म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त करणे नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

BMC Budget: मोफत स्टेशनरी, पदवीपर्यंत फी भरण्याची तरतूद अन्...; बीएमसीचा ₹४,२४८ कोटींचा शिक्षण अर्थसंकल्प सादर, योजना काय आहेत?

Maharashtra Government Employees: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शासनाचा जीआर; पगार वाढला, फरकही मिळणार

कधीकधी भीती वाटते... 'आई कुठे काय करते' फेम गौरी कुलकर्णीने घेतलाय लग्नाचा निर्णय; कारण सांगत म्हणाली- आई-बाबा बीडला...

Mumbai Police Arrest 25 Bangladeshis : मुंबई पोलिसांनी सापळा रचून २५ बांगलादेशींना केली अटक ; बनावट कागदपत्रेही जप्त

SCROLL FOR NEXT