मुंबई

एल्फिन्स्टन पूल बधितांना म्हाडाची घरे नकोशी

CD

एल्फिन्स्टन पूलबाधितांना म्हाडाची घरे नकोशी
रहिवाशांनी १२ घरे नाकारली; घरे बदलून देण्यासाठी एमएमआरडीएचे म्हाडाला पत्र
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : वरळी-शिवडी कनेक्टरसाठी एल्फिन्स्टन येथे सध्याचा पूल काढून एमएमआरडीएकडून डबल डेकर पूल उभारला जाणार आहे. त्यामुळे बाधित होत असलेल्या रहिवाशांना एमएमआरडीएने म्हाडाची ७८ घरे दिली आहेत. त्यापैकी अँटॉप हिल, दादर पूर्व आणि भायखळा येथील १२ घरे रहिवाशांना नकोशी आहेत. त्यामुळे त्यांनी त्याचा ताबा घेण्यास साफ नकार दिल्याने एमएमआरडीएनेही म्हाडाला ही घरे बदलून देण्याबाबत पत्र दिले आहे. त्यामुळे आता म्हाडा काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
एल्फिन्स्टन पुलाच्या कामामुळे बाजूलाच असलेल्या हाजी नुरानी आणि लक्ष्मी निवास या दोन इमारती बाधित होणार आहेत. लक्ष्मी निवास या इमारतीत ६० तर हाजी नुरानी या इमारतीत २३ रहिवासी आहेत. संबंधित रहिवाशांना दादर, प्रभादेवी, वडाळा, लोअर परळ, भायखळा या भागातील म्हाडाची ८३ घरे मालकी तत्त्वावर दिली जाणार होती. मात्र पाच रहिवाशांची इतरत्र व्यवस्था झाल्याने एमएमआरडीएने ७८ घरे घेत त्यापोटी म्हाडाला ८९ कोटी रुपये दिले आहेत. त्यानुसार एमएमआरडीएकडून संबंधित रहिवाशांना घरांचा ताबा दिला असला तरी अँटॉप हिल, दादर पूर्व आणि भायखळा येथे घरे असलेला परिसर योग्य नसल्याने १२ रहिवाशांनी घरांचा ताबा न घेता चांगल्या ठिकाणची घरे देण्याची मागणी केली. त्या पार्श्वभूमीवर एमएमआरडीए म्हाडाला पत्र पाठवत या घरांच्या बदल्यात दुसरी घरे दिली जावीत, असे स्पष्ट केल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

वाढीव किंमत द्यावी लागणार
म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या मालकीची असलेली ही घरे रेडिरेकनर दराच्या ११० टक्के किमतीला दिली आहेत. त्यापोटी एमएमआरडीएने ८९ कोटी ३९ लाख ७७ हजार रुपये म्हाडाला वळते केले आहेत. दरम्यान, एमएमआरडीएने आता १२ घरे बदलून मागितली आहेत. त्यामुळे घरे देण्याचा निर्णय झाल्यास ती घरे ज्या ठिकाणी आहेत तेथील रेडिरेकनर दरानुसार वाढीव किंमत द्यावी लागेल. त्यानंतरच घरे देता येतील, असे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Government Employees: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शासनाचा जीआर; पगार वाढला, फरकही मिळणार

Arjun Tendulkar Wedding : गणपती बाप्पाचा आशीर्वाद! अर्जुन-सानियाच्या लग्नासाठी तेंडुलकर कुटूंब पोहोचले 'खास' ठिकाणी; सचिन म्हणाला, जेव्हा मुलगा एका मुलीला घरी घेऊन येतो तेव्हा...

Holi Thandai Recipe: होळीला पाहुण्यांची मनं जिंकायची आहेत? मिनिटांत तयार करा 'थंडाई' पिताच सगळे म्हणतील ‘अरे वा!’, जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांनी विधिमंडळात उपस्थित केला PM किसान, नमो शेतकरी योजनेतील पात्र लाभार्थ्यांचा मुद्दा

Igatpuri News : बेरोजगारीवर मात! इगतपुरीतील तरुण पिढीचा दुग्धव्यवसायाकडे वाढता कल; रोज १ लाख लिटर संकलन

SCROLL FOR NEXT