मुंबई

अर्थसंकल्पात आरोग्यासाठी ७,४५७ कोटींची तरतूद

CD

अर्थसंकल्पात आरोग्यासाठी
७,४५७ कोटींची तरतूद

पीपीपी, डिजिटल सुविधा; रुग्णालय पुनर्विकासावर भर

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : २०२६-२७च्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी सात हजार ४५७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात ५,२३७ कोटी महसुली खर्च आणि २,२२० कोटी भांडवली खर्चाचा समावेश असून, हा हिस्सा एकूण अंदाजपत्रकाच्या सुमारे नऊ टक्के आहे. गतवर्षीच्या तुलनेत सुमारे २२ टक्क्यांची वाढ नोंदवली असली तरी आरोग्याचा टक्का १० टक्क्यांवरून किंचित घसरला आहे.
-----
आरोग्यावरील वाढीव तरतूद ही सकारात्मक बाब आहे. वाढत्या रुग्णभाराच्या पार्श्वभूमीवर आरोग्याचा हिस्सा अधिक असणे गरजेचे आहे. प्रतिबंधात्मक आरोग्य, डिजिटल प्रणाली आणि पीपीपी उपक्रम योग्य प्रकारे राबवले, तर मुंबईकरांना अधिक दर्जेदार व सुलभ आरोग्यसेवा मिळू शकते.
- डाॅ. अविनाश सुपे, माजी अधिष्ठाता
......
संशाेधनावर भर
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद व राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था यांच्या सहयोगाने हिवतापविराेधी औषधांचे परिणामकारक संशोधन करण्यावर यंदा भर देण्यात येणार आहे. त्याचबरोबच औषध प्रतिरोधक क्षयरोगामधील उत्परिवर्तन ओखण्यासाठी करण्यात येत असलेल्या जीनोम सिक्वेन्सिंगबाबतचे संशोधन पूर्ण झाले असून, केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर चाचणी करण्यात येणार आहे.
.....
पीपीपी तत्त्वावर आरोग्य सुविधा
२०२६-२७ मध्ये पहिल्या टप्प्यामध्ये तीन रक्तशुद्धीकरण केंद्रे, तीन दवाखाने, विविध रुग्णालयांत सीटी स्कॅन, एमआरआय, रक्तशुद्धीकरण केंद्र, कॅथलॅब, रक्तपेढी सुविधा आणि अतिदक्षता विभाग सार्वजनिक खासगी तत्त्वावर (पीपीपी) उपलब्ध करण्यात येणार आहेत.
----
खाटांच्या उपलब्धतेसाठी डॅशबोर्ड
सर्व प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये, विशेष रुग्णालये, प्रसूतिगृहांत उपलब्ध खाटांचा केंद्रीकृत डॅशबोर्ड तयार करण्यात येणार आहे. यावर खाटांची माहिती दररोज अद्ययावत होणार आहे. यामुळे नागरिकांना व प्रशासनाला खाटांच्या व्यवस्थापनासाठी मदत होणार आहे.
----
चार रुग्णालयांत डीएनबी सुरू करणार
नागरिकांना घराजवळच उत्तम दर्जाचे उपचार मिळावेत यासाठी महापालिकेकडून यंदा आणखी चार रुग्णालयांत डीएनबी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मालाडमधील म. वा. देसाई रुग्णालय, बोरिवलीतील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय, मुलुंडमधील सावरकर रुग्णालय, बर्वे नगरमधील संत मुक्ताबाई रुग्णालयात हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

Udgir Gutkha Seized : पाठलाग करून साडेदहा लाखांचा गुटखा पकडला; एक चारचाकी तर एक आरोपी ताब्यात

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Yermala News : कलाकेंद्र चालकाचा नियमांचा भंग; महाकाली कला केंद्राबाबत जिल्हाधिकारी यांचा मोठा निर्णय

Mumbai: चालत्या ट्रेनमधून केसांना धरत तरुणीला बाहेर ओढलं नंतर...; महिलेचं धक्कादायक कृत्य, मुंबई लोकलमधील राड्याचा व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT