मुंबई

राणी बागेचा होणार कायापालट; चित्ता, उपहारगृह, मत्स्यालय आणि नव्या प्रकल्पांसाठी १३६ कोटींची तरतूद

CD

राणी बागेचा होणार कायापालट
चित्ता, उपहारगृह, मत्स्यालय, नव्या प्रकल्पांसाठी १३६ कोटींची तरतूद
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २५ : मुंबईकरांचे लाडके पर्यटनस्थळ असलेल्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या (राणी बाग) आधुनिकीकरणाला आता वेग मिळणार आहे. प्राणिसंग्रहालयाचा विस्तार, जागतिक दर्जाचे मत्स्यालय आणि विदेशी प्राण्यांच्या आगमनासाठी महापालिकेने २०२६-२७च्या अर्थसंकल्पात १३६.७० कोटी रुपयांची भरीव तरतूद प्रस्तावित केली आहे.

​चित्ता आणि जिराफ पाहता येणार
राणी बागेच्या विस्तारित भूखंडावर १८ विशिष्ट विदेशी प्राण्यांच्या अधिवासासाठी विशेष प्रदर्शनी उभारली जात आहे. याचे मुख्य आकर्षण म्हणजे आफ्रिकन थीमवर आधारित दोनमजली ‘चित्ता उपहारगृह.’ या उपहारगृहात बसून पर्यटकांना जिराफ आणि चित्त्यांचे दर्शन घेता येणार आहे. हा प्रकल्प पर्यटकांच्या अनुभवात मोठी भर घालणारा ठरेल.

​देशातील पहिले अत्याधुनिक मत्स्यालय
सागरी जीवनाची ओळख करून देण्यासाठी उद्यानात एक भव्य मत्स्यालय उभारले जात आहे. यामध्ये स्थानिक माशांच्या ७० हून अधिक प्रजाती पाहायला मिळतील. डिसेंबर २०२६पर्यंत हे मत्स्यालय जनतेसाठी खुले करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासोबतच पक्ष्यांसाठी स्वतंत्र रुग्णालय, आधुनिक स्वयंपाकघर आणि अंतर्गत सेवा रस्ते अशा पायाभूत सुविधांचे काम २०२७पर्यंत पूर्ण केले जाणार आहे.

​मुलुंडमध्ये नवे पक्षी उद्यान
भायखळ्यातील राणी बागेसोबतच महापालिका मुलुंड (पश्चिम) येथील नाहूर भागात स्वतंत्र विदेशी पक्षी प्रदर्शनी आणि पक्षी उद्यान उभारणार आहे. येथे दुर्मिळ आणि रंगीबेरंगी विदेशी पक्षी ठेवण्यात येणार असून, २०२७पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या सर्व उपक्रमांमुळे मुंबईच्या पर्यटन आणि शैक्षणिक वैभवात मोठी भर पडणार आहे.
.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT