मुंबई

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दादरमध्ये विशेष व्याख्यान

CD

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दादरमध्ये विशेष व्याख्यान
मुंबई, ता. ३ : मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर स्वायत्त विभागाच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘मराठी बोलू कौतुके’ या विषयावर सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संपादक अशोक बेंडखळे यांनी आपले विचार मांडले.
हा कार्यक्रम शुक्रवारी (ता. २७) सकाळी ११ वाजता दादर (पश्चिम) येथील डॉ. डिसिल्वा रोडवरील ग्रंथसंग्रहालयाच्या सभागृहात झाला. मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनाच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. व्याख्यानात अशोक बेंडखळे यांनी मराठी भाषेचे सौंदर्य, अभिव्यक्तीची ताकद आणि नव्या पिढीतील भाषाजागृती यावर भाष्य केले. कार्यक्रमानंतर ग्रंथसंग्रहालयातर्फे आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांचा विशेष अभिनंदन सोहळाही झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! १८.६३ कोटींचे अमली पदार्थ भस्मसात

भाजपची राज्यसभेची पहिली यादी जाहीर; राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन बिहारमधून उमेदवार, महाराष्ट्रातून कोण कोण?

Dry Fruits Price : युद्धाची झळ सुकामेव्याला! इराण-इस्रायल वादामुळे खजूर आणि बदामाचे दर वाढणार

खेळाडूंकडून ५० लाख दंड वसूल काय करताय, आणखी कठोर कारवाई करा! शाहिद आफ्रिदीने PCB ला दिला सल्ला; म्हणाला, दोन वर्षांसाठी...

Latest Marathi News Live Update : धुळे ग्रामस्थांच्या मदतीने 5 दरोडेखोर गजाआड, 19 लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT