महाराष्ट्र अग्रगण्य लॉजिस्टिक्स गेटवे
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचा विश्वास
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : राज्याला देशातील सर्वात सक्षम आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक लॉजिस्टिक्स केंद्र बनवण्याचा परिवहन विभाग पथदर्शक म्हणून भूमिका बजावेल, असे प्रतिपादन राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
ते ‘ऑल इंडिया लॉजिस्टिक वेल्फेअर असोसिएशन’ आयोजित समीटला भेट दिल्याप्रसंगी बोलत होते. सरनाईक म्हणाले की मुंबई ही केवळ देशाची आर्थिक राजधानी नसून आंतरराष्ट्रीय कार्गो हब म्हणूनही वेगाने विकसित होत आहे. मुंबईतून औषधे, ताजी कृषी उत्पादने, अभियांत्रिकी साहित्य आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची मोठ्या प्रमाणावर निर्यात होत आहे. जागतिक बाजारपेठेत महाराष्ट्राची मजबूत उपस्थिती आहे.
महाराष्ट्राला मध्य पूर्व, युरोप आणि दक्षिण-पूर्व आशियातील बाजारपेठांशी अधिक प्रभावीपणे जोडण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग सारख्या द्रुतगती मार्गांमुळे प्रवासाचा कालावधी कमी झाला आहे. राज्यातील मालवाहतुकीला वेग मिळाला आहे.
पीएम गतिशक्ती मास्टर प्लॅन अंतर्गत केंद्र सरकारसोबत समन्वय साधत बंदरे, विमानतळ, रेल्वे आणि रस्ते यांच्यात सुसूत्रता निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. यामुळे लॉजिस्टिक्स ऑपरेशन्स अधिक सुलभ आणि परिणामकारक होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
व्यवस्था उभारण्यासाठी कटिबद्ध
रस्ता वाहतूक ही अर्थव्यवस्थेचा कणा असून, ६५ टक्क्यांहून अधिक मालवाहतूक रस्त्यांमार्फत होते. ऑल इंडिया ट्रान्सपोर्टर्स वेलफेअर असोसिएशन आणि बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशन यांसारख्या संघटनांसोबत समन्वयाने काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील अनेक आरटीओ सेवा ऑनलाइन व फेसलेस करण्यात आल्याने पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढली आहे. “महाराष्ट्र जलद, स्मार्ट आणि जागतिक दर्जाची लॉजिस्टिक्स व्यवस्था उभारण्यासाठी कटिबद्ध आहे. राज्याला देशाचे ‘लीडिंग लॉजिस्टिक्स गेटवे’ बनवण्याचा विश्वास, मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.