मुंबई

‘अनन्या’साठी आले हवाईमार्गाने हृदय

CD

‘अनन्या’साठी आले हवाईमार्गाने हृदय!
गोव्याच्या कन्येवर मुंबईत प्रत्यारोपण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : जेनेटिक कार्डिओमायोपॅथीने ग्रस्त असलेल्या गोव्याच्या १० वर्षीय अनन्या नावाच्या कन्येला प्रकृती नाजूक झाल्याने उपचारासाठी विमानाने मुंबईत आणले होते. तिच्यावर उपचार सुरू असताना छ. संभाजीनगर येथील रुग्णाचे हृदय उपलब्ध होताच ते विमानाने आणून तिच्यावर प्रत्यारोपित करण्यात आले. त्यामुळे तिला नवजीवन लाभले आहे. ही अनोखी कहाणी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात घडली. हे यंदाचे देशातील पहिले हृदय प्रत्यारोपण ठरले आहे.
गोव्यातील या बालरुग्णाचे हृदय आनुवंशिक जेनेटिक कार्डिओमायोपॅथीमुळे केवळ १० टक्के क्षमतेने कार्यरत होते. प्रकृती अत्यंत नाजूक झाल्याने तिला एअरलिफ्ट करून मुंबईत दाखल करण्यात आले. औषधोपचारानंतरही स्थिती गंभीर राहिल्याने तिला ईसीएमओ, एकमो म्हणजे अशी मशीन जी काहीकाळासाठी हृदय आणि फुप्फुसांचे काम शरीराबाहेरून करते, ती लावण्यात आली. याद्वारे रुग्णाचे रक्त शरीरातून बाहेर काढून मशीनमध्ये पाठवले जाते. तिला एकमो सपोर्टवर ठेवण्यात आले आणि ‘सुपर-अर्जंट’ यादीत तिची नोंद करण्यात आली. दरम्यान, दीर्घकाळ प्रतीक्षा आणि प्रकृती खालावत असल्याने तज्ज्ञांनी तिच्या शरीरात एलव्हीएडी (लेफ्ट वेंट्रिकुलर असिस्ट डिव्हाइस बसवण्याचा निर्णय घेतला. मुलांमध्ये एलव्हीएडी (लेफ्ट वेंट्रिकुलर असिस्ट डिव्हाइस) वापरणे अत्यंत आव्हानात्मक मानले जाते. याच काळात छ. संभाजीनगर येथे अपघातात मृत्यू झालेल्या ५६ वर्षीय दात्याचे हृदय उपलब्ध झाले. शासकीय यंत्रणांच्या समन्वयातून ते हृदय तातडीने हवाई मार्गाने मुंबईत आणण्यात आले. वजनातील तफावत आणि जोखीम असूनही वैद्यकीय पथकाने प्रत्यारोपण यशस्वी केले. अवघ्या तीन दिवसांत अनन्याला व्हेंटिलेटरवरून बाहेर काढण्यात आले आणि दोन आठवड्यांत तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे बालहृदय प्रत्यारोपण क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
...
आव्हानात्मक काम!
कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्या कन्सल्टंट पीडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट डॉ. तनुजा करंडे यांनी सांगितले, की मुलांमध्ये लेफ्ट वेंट्रिकुलर असिस्ट डिव्हाइस हाताळणे अत्यंत आव्हानात्मक असून यासाठी अनुभवी सर्जिकल टीम आणि कुशल आयसीयूची गरज असते. चिल्ड्रन्स हार्ट सेंटरचे संचालक डॉ. सुरेश राव यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: ८ चेंडूंत ४० धावा! अभिषेक शर्माची फिफ्टी, सूर्याला 'स्वच्छ भारत'चा सदिच्छादूत बनवण्याची गावस्करांची मागणी

Parth Pawar to Join Rajya Sabha: पार्थ पवार राज्यसभेवर जाणार! राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रफुल पटेल यांनी केली घोषणा

IND vs ZIM, T20 WC: संजू सॅमसनकडून पुन्हा अपेक्षाभंग! बाद होताच सन्नाटा, डग आऊटमध्ये गौतम गंभीरने काय केले ते वाचा? सारेच चक्रावले

India Semi-Final Scenario: द. आफ्रिकेच्या विंडीजवरील विजयानं भारताचं नेट रन रेटचं टेन्शन झालं कमी! आता कसं आहे सेमीफायनलचं समीकरण?

Shivraj Singh Chouhan News : शेतकऱ्यांसाठी Good News!, केंद्रीय कृषिमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, म्हणाले..

SCROLL FOR NEXT