मुंबई

वैद्यकीय देयकांचा निपटारा आता ‘महाकर्मी’ पोर्टलद्वारे

CD

राज्य कर्मचाऱ्यांसाठी ‘महाकर्मी’ पोर्टल
‘व्हीएएमएस’मुळे वैद्यकीय मनुष्यबळ व्यवस्थापन अधिक सक्षम

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती प्रक्रियेला गती देण्यासाठी ‘महाकर्मी मेडिकल बिल क्लेम वेब पोर्टल’चा शुभारंभ आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच राज्यातील वैद्यकीय मनुष्यबळ व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी ‘वैद्यकीय अधिकारी मॅनेजमेंट सिस्टीम’ (व्हीएएमएस) हे डिजिटल पोर्टलही सुरू करण्यात आले. आरोग्य प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि डेटा-आधारित करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग यांच्या मते, या दोन्ही उपक्रमांमुळे आरोग्य विभागातील डिजिटल परिवर्तनाला चालना मिळणार असून, कर्मचारी हित आणि रुग्णसेवा गुणवत्ता या दुहेरी उद्दिष्टांना बळकटी मिळेल. ‘महाकर्मी’ पोर्टलद्वारे शासकीय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्चाचे अर्ज ऑनलाइन सादर करता येणार असून, त्यांचा निपटारा निश्चित कालमर्यादेत होणार आहे. त्यामुळे कार्यालयीन दिरंगाई कमी होऊन प्रक्रियेला वेग येणार आहे. ‘महाराष्ट्र कर्मचारी रुग्ण मित्र’ या संकल्पनेवर आधारित ही प्रणाली कर्मचारी हिताची असल्याचे विभागाने स्पष्ट केले.
दरम्यान, ‘व्हीएएमएस’ पोर्टलमुळे राज्यातील डॉक्टरांची पदनिहाय माहिती, तज्ज्ञांची उपलब्धता, रिक्त पदे, सेवा तपशील तसेच अनुपस्थिती यांची अचूक नोंद ठेवता येणार आहे. जिल्हानिहाय तज्ज्ञांची कमतरता ओळखून ग्रामीण व दुर्गम भागात नियोजनबद्ध पद्धतीने मनुष्यबळाची नेमणूक करता येणार आहे. बदली, पदोन्नती आणि नव्या नियुक्त्यांची प्रक्रिया अधिक शास्त्रोक्त पद्धतीने राबविण्यासही या प्रणालीचा उपयोग होणार आहे.



महाकर्मी पोर्टलची वैशिष्ट्ये :
वैद्यकीय बिलांची ऑनलाइन सादर व छाननी
निश्चित कालमर्यादेत प्रतिपूर्ती
प्रक्रियेत पारदर्शकता व वेग

वॅम्स पोर्टल वैशिष्ट्ये :
जिल्हानिहाय रिक्त व भरलेली पदे
विशेषज्ञ डॉक्टरांची उपलब्धता
नियमित/करारनिहाय सेवा तपशील
रिअल-टाइम अहवाल प्रणाली
डेटा-आधारित मनुष्यबळ नियोजन

गेल्या अधिवेशनात दिलेले आश्वासन आम्ही पूर्ण केले आहे. शासन आपल्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. वैद्यकीय देयकांच्या प्रतिपूर्तीमध्ये विलंब होणार नाही, यासाठी ही डिजिटल व्यवस्था महत्त्वाची ठरेल. डेटा अचूक ठेवा आणि सर्व बिले ऑनलाइन पद्धतीनेच निपटवा, अशी आमची भूमिका आहे. पारदर्शकता आणि कार्यक्षमतेच्या माध्यमातूनच ‘निरोगी महाराष्ट्र’ घडवू.
-प्रकाश आबिटकर, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: ८ चेंडूंत ४० धावा! अभिषेक शर्माची फिफ्टी, सूर्याला 'स्वच्छ भारत'चा सदिच्छादूत बनवण्याची गावस्करांची मागणी

Parth Pawar to Join Rajya Sabha: पार्थ पवार राज्यसभेवर जाणार! राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रफुल पटेल यांनी केली घोषणा

IND vs ZIM, T20 WC: संजू सॅमसनकडून पुन्हा अपेक्षाभंग! बाद होताच सन्नाटा, डग आऊटमध्ये गौतम गंभीरने काय केले ते वाचा? सारेच चक्रावले

India Semi-Final Scenario: द. आफ्रिकेच्या विंडीजवरील विजयानं भारताचं नेट रन रेटचं टेन्शन झालं कमी! आता कसं आहे सेमीफायनलचं समीकरण?

Shivraj Singh Chouhan News : शेतकऱ्यांसाठी Good News!, केंद्रीय कृषिमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, म्हणाले..

SCROLL FOR NEXT