किंग्ज सर्कलजवळ जीवघेणा हल्ला
चार जणांना रेल्वे पोलिसांकडून अटक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : माहीम रेल्वे स्थानक ते किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकदरम्यान हार्बर मार्गावरील पटरी क्रमांक ६ जवळ झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी वडाळा रेल्वे पोलिसांनी २४ तासांत चार आरोपींना अटक केली. याप्रकरणी गंभीर दुखापत करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. २३) रात्री ही घटना घडली. जुन्या वादातून आरोपींनी फिर्यादीच्या मित्राला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर चाकूने वार करत त्याला गंभीर जखमी केले. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शहूनगर पोलिस ठाण्यातील गुन्हा वडाळा रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेत आरोपींचा शोध सुरू केला. अभिषेक जाधव (वय २५), बॉबी वाघ (वय २३), रोहन पटेकर (वय १९) आणि मनोज गुप्ता (वय ३८) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सर्व आरोपी माटुंगा लेबर कॅम्प परिसरातील रहिवासी आहेत. तांत्रिक माहिती व बातमीदारांच्या मदतीने चारही आरोपींना अटक करण्यात आली. पुढील तपास वडाळा रेल्वे पोलिस करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.