मुंबई

एमबीए, एमएमएसच्या सीईटीसाठी १ लाख ८० हजार विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार

CD

एमबीए, एमएमएसच्या सीईटीसाठी
एक लाख ८० हजार विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार

मुंबई, ता. २७ : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन/मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एमबीए/ एमएमएस) या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची सीईटी प्रवेश नोंदणी दिनांक २५ फेब्रुवारीला संपली. यावर्षी प्रथमच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या निर्णयामुळे, विद्यार्थ्यास प्रवेश परीक्षेसाठी दोन संधी देण्याचा निर्णय सीईटी कक्षाने घेतला. यामुळे एमबीए, एमएमएस प्रवेश परीक्षेसाठी यावर्षी पहिल्या संधीसाठी एक लाख ३२ हजार ७९८ तर दुसऱ्या संधीसाठी ४७ हजार ९९४ विद्यार्थ्यांनी अंतिम नोंदणी केली आहे. दोन्ही संधी मिळून एक लाख ८० हजार ७९२ विद्यार्थी ही प्रवेश परीक्षा देणार आहेत. आता या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या नोंदणी अर्जामध्ये जर काही दुरुस्त्या असतील, तर त्यासाठी दिनांक २८ फेब्रुवारी ते २ मार्च यादरम्यान ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
एमबीए, एमएमएससाठी पहिल्या संधीची प्रवेश परीक्षा ६ ते ८ एप्रिल २०२६ दरम्यान घेण्यात येणार आहे, तर दुसऱ्या संधीची प्रवेश परीक्षा ९ मे २०२६ मध्ये होणार आहे. या सीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संगणकाधारित पद्धतीने ऑनलाइन घेतल्या जातील.
२०२६ च्या सीईटीसाठी एमबीए, एमएमएस या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीईटी प्रवेश नोंदणीला १० जानेवारी २०२६ पासून सुरुवात झाली होती. नोंदणीची अंतिम तारीख १२ फेब्रुवारी होती. याला २० फेब्रुवारीपर्यंत पहिली मुदतवाढ देण्यात आली होती. तसेच दुसरी व अंतिम मुदतवाढ २५ फेब्रुवारीपर्यंत करण्यात आली होती.
--
अर्जातील दुरुस्तीसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध
एमबीए, एमएमएस या सामाईक प्रवेश परीक्षेकरिता ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी प्रक्रिया परीक्षा शुल्क अदा करून पूर्ण केली आहे, त्यापैकी काही विद्यार्थांकडून अर्ज भरताना अनावधानाने काही चुका झाल्या असतील, तर त्या दुरुस्तीसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही दुरुस्तीची सुविधा २८ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ दरम्यान उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःच्या लॉगीनमध्ये जाऊन ही दुरुस्ती करावयाची आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने भरलेल्या अर्जात त्याचे नाव, जन्मतारीख, छायाचित्र, सही, लिंग (Gender) व दोन संधी (Both attempt) यामध्ये दुरुस्ती व बदल करण्याची सुविधा देण्यात येत आहे.

एमबीए, एमएमएसचे नोंदणी केलेले विद्यार्थी
वर्ष विद्यार्थ्यांची संख्या
२०२३-२४ : १,३०,९२७
२०२४-२५ : १,५२,९११
२०२५-२६ : १,५७,२८१
२०२६-२७ : १,८०,७९२ (दोन्ही संधी मिळून )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: लोकलचे वेळापत्रक कोलमडणार! अनेक गाड्या रद्द होणार; पण कधी? रेल्वे प्रशासनाची महत्त्वाची माहिती

IPL 2026 Date Change : इंडियन प्रीमिअर लीग २६ मार्च ऐवजी 'या' तारखेला सुरू होणार; जाणून घ्या त्यामागचं महत्त्वाचं कारण...

Home Loan: ८ वर्षे EMI, ३ थकलेले हप्ते आणि ६० दिवस; १.२ कोटींचे घर गमावले: भारतीय स्वीकारण्यास नकार देत असलेले सर्वात कटू वास्तव

Latest Marathi News Live Update : मार्वे पठारे वाडीतील अवैध बांधकामांवर कारवाई

Shahu Mill Memorial : शाहू मिलचा स्मारक आराखडा लवकरच उच्चस्तरीय समितीकडे; राजेश क्षीरसागर यांनी आराखडा सादर करण्याचे दिले आदेश

SCROLL FOR NEXT