मुंबई

पवई

CD

पवईतील शाळेजवळील ‘तो’ रस्ता अजूनही खासगीच
महापालिकेचा प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयात पुनरूच्चार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : पवईतील एका शाळेजवळील रस्ता हा अजूनही खासगी मालकीचा असून तो औपचारिकरीत्या आपल्याकडे हस्तांतरित केला नसल्याचा दावा पुन्हा एकदा मुंबई महापालिकेने शुक्रवारी (ता. २७) उच्च न्यायालयात केला. त्याचवेळी खासगी मालकीच्या या रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली जातील, असेही महापालिकेने न्यायालयाला सांगितले.
पवईतील ब्यूमोंट एचएफएसआय स्कूल आणि तिच्या प्राचार्या कल्याणी पटनायक यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्या.रवींद्र घुगे आणि न्या.अभय मंत्री यांच्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडली. त्यावेळी महापालिका आयुक्तांकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. जमीन मालक/विकासकाने २०२० पासून प्रक्रियात्मक अनुपालन पूर्ण करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. विकासक ही कागदपत्रे सादर करण्यात अयशस्वी ठरल्यामुळे हस्तांतरणाचा अर्ज पुढे गेला नाही. परिणामी, शाळेजवळील रस्त्याचा ताबा आजपर्यंत महापालिकेने घेतला नसल्याचा दावा भूषण गगराणी प्रतिज्ञापत्राद्वारे केला.

कृती आराखडा मागवला
याशिवाय, रस्ते, सांडपाणी आणि हायड्रॉलिक अभियांत्रिकी यासारख्या महानगरपालिकेच्या विभागांकडून अनिवार्य मंजुरी न घेता विकासकाने रस्ता बांधला होता आणि त्यावर योग्य पाणी निचरा आणि रस्त्यावरील दिवे यासह पायाभूत सुविधांचा अभाव होता. हा रस्ता परिसरातील नागरिक वापरत असल्याने सार्वजनिक रस्ता बनला आहे, तरीही नियमन आणि आरेखनानुसार तो अजूनही सार्वजनिक रस्ता नाही, असेही महापालिकेच्या वकील धृती कपाडिया यांनी न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर, आम्ही महापालिकेकडून अतिक्रमणे हटवण्याबाबतचा कृती आराखडा मागत असल्याचे खंडपीठाने सुनावले आणि न्यायालयाने सुनावणी तहकूब केली. वाङ्‌मय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karachi US Consulate Protest : कराचीतील अमेरिकन दूतावासात घुसले निर्दशक, सैनिकांच्या गोळीबारात १० जणांचा मृत्यू

Chembur Accident: चेंबूर मजूर मृत्यू प्रकरण! विकसकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, महापौरांचे निर्देश

Latest Marathi News Update : जिल्हा परिषद सदस्य निवडीचा अधिकार पूर्णपणे सुनेत्रा वहिनींना - दत्तात्रेय भरणे

वयाने मोठी दिसते म्हणून सोनालीला हिंदी प्रोजेक्टमधून काढलं ; "मला फिलर्स वापरायचा सल्ला.."

Lasalgaon News : इराण-अमेरिका युद्धाचा फटका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना; दुबई विमानतळ बंद झाल्याने भाजीपाला निर्यात ठप्प

SCROLL FOR NEXT