मुंबई

चेंबूरमध्ये निर्माणाधीन इमारतीवरून ६ मजूर कोसळले; एकाचा मृत्यू, एक गंभीर

CD

इमारतीवरून पडल्याने एकाचा मृत्यू
एक गंभीर; चेंबूरमधील घटनेत सहा मजूर कोसळले

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ ः चेंबूर येथील सुभाषनगर भागात एका निर्माणाधीन इमारतीवरून सहा मजूर खाली पडल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. २८) दुपारी घडली. या दुर्घटनेत ५५ वर्षीय मजुराचा मृत्यू झाला, तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
सुभाषनगरमधील इमारत क्रमांक ३६ च्या बांधकामाच्या ठिकाणी शनिवारी दुपारी १२च्या सुमारास सहा मजूर उंचावरून खाली कोसळले. घटनेची माहिती मिळताच, मुंबई अग्निशमन दल, पोलिस आणि पालिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रामल्लू (५५) यांना मृत घोषित करण्यात आले. गुणधर राय (२२) या मजुराची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्याला अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्यात आले आहे. इतर चार मजूर उसराय (३०), रमेश राय (२५), विजय (३५) आणि संदीप (२७) यांच्यावर ट्रॉमा वॉर्डमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. याप्रकरणी पालिकेच्या संबंधित विभागाकडून अधिक चौकशी सुरू आहे.
.........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Embassy in Kuwait Issues Urgent Advisory : युद्ध परिस्थितीमुळे कुवेतमधील भारतीय दूतावासाने जारी केली तातडीची सूचना, म्हटले...

Rajya Sabha Election: विदर्भातून राज्यसभेवर कोण जाणार? भाजपच्या तंबूत तीव्र लॉबिंग सुरू, 'या' तीन बड्या नेत्यांची नावे चर्चेत

Ajit Pawar Plane Crash: विमान अपघाताचा २२ पानांचा प्राथमिक अहवाल आला; ब्लॅक बॉक्समध्ये काय आढळलं? विमान झाडावर कोसळलं अन्...

Latest Marathi News Live Update : अक्षता टाकण्यापूर्वीच वरपित्याचा मृत्यू..!

Thane News: वालधुनी नदीवर घाट उभारणीस अडथळा, ३० घरांना नोटीसा; दोन दिवसांत घरे रिकामी करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT