मुंबई

मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत खडखडाट? सुधारित अंदाजापेक्षा वसुलीत मोठी पिछाडी; जानेवारी २०२६ पर्यंत केवळ ७२ टक्के महसूल जमा

CD

मुंबई महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट
सुधारित अंदाजापेक्षा वसुलीत मोठी पिछाडी; ७२ टक्के महसूल जमा

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २८ : मुंबई महापालिकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी महसुली उत्पन्नाचे जे ‘सुधारित अंदाज’ वर्तवले होते, त्या तुलनेत प्रत्यक्ष वसुलीचे आकडे चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. जानेवारी २०२६ अखेरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, पालिकेला अपेक्षित उत्पन्नाच्या तुलनेत मोठी तूट सोसावी लागत आहे. विशेषतः राज्य सरकारकडून येणारे अनुदान आणि विकास नियोजन शुल्काची वसुली संथ गतीने होत असल्याने पालिकेच्या आर्थिक नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

​पालिकेने २०२५-२६ या वर्षासाठी ४६,७७८.१२ कोटी रुपयांच्या महसुली उत्पन्नाचा सुधारित अंदाज व्यक्त केला होता. मात्र, आर्थिक वर्ष संपायला केवळ दोन महिने शिल्लक असताना, जानेवारी २०२६ पर्यंत पालिकेच्या पदरात केवळ ३४,०३३.५६ कोटी रुपये पडले आहेत. म्हणजेच अद्याप १२,७४४.५६ कोटी रुपयांची वसुली होणे बाकी आहे.
......
अनुदानाची मोठी थकबाकी
​सर्वात धक्कादायक आकडेवारी राज्य शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाची आहे. पालिकेने १,०८६ कोटी रुपयांची अपेक्षा व्यक्त केली असताना, जानेवारीपर्यंत केवळ २२ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. यामुळे पालिकेच्या विकासकामांच्या अंमलबजावणीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कठीण डोंगर
​चालू वर्षातील वसुली अपेक्षित टप्प्यापर्यंत पोहोचलेली नसतानाही, पालिकेने आगामी २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ५१,५१०.९४ कोटी रुपयांचे मोठे उद्दिष्ट ठेवले आहे. मालमत्ता करातून ६,२०० कोटी आणि विकास नियोजन शुल्कातून १२,०५० कोटी रुपये मिळतील, असा पालिकेचा विश्वास आहे. मात्र, चालू वर्षातील थकबाकी पाहता हे उद्दिष्ट गाठणे पालिकेसाठी ‘कठीण डोंगर’ चढण्यासारखे असेल. पालिकेची भिस्त प्रामुख्याने जकातीपोटी मिळणाऱ्या नुकसान भरपाईवर (१५,५५० कोटी) आहे, परंतु इतर स्वबळावरील उत्पन्नाचे स्रोत आटताना दिसत आहेत. फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांत पालिकेला विक्रमी वसुली करावी लागणार आहे.
......
​प्रमुख विभागांमधील वसुलीची स्थिती :
उत्पन्नाचे स्रोत २०२५-२६ सुधारित अंदाज (कोटीत) जानेवारी २०२६ पर्यंत प्रत्यक्ष वसुली (कोटीत) टक्केवारी (%)

विकास नियोजन शुल्क ११,१५३.७५ / ८,१३८.२६/ ७३%
मालमत्ता कर ६,२००.०० /४,८१२.३४ /७७%

राज्य शासन अनुदान १,०८६.८५ / २२.०८ / २%

जल व मलनिस्सारण २,२१२.९१ /१,३३३.५८/ ६०%

एकूण महसुली उत्पन्न ४६,७७८.१२/३४,०३३.५६/ ७२.७%
........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CIDCO Lottery: नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सिडकोने गृहनिर्माण योजनेची अंतिम मुदत; आता शेवटची तारीख काय?

Horoscope : नवा महिना, नवा राजयोग! उद्या 1 मार्चपासून पुढचे 4 दिवस 'या' 4 राशीच्या लोकांसाठी लकी, होणार धनलाभ

Indian Embassy in Kuwait Issues Urgent Advisory : युद्ध परिस्थितीमुळे कुवेतमधील भारतीय दूतावासाने जारी केली तातडीची सूचना, म्हटले...

Rajya Sabha Election: विदर्भातून राज्यसभेवर कोण जाणार? भाजपच्या तंबूत तीव्र लॉबिंग सुरू, 'या' तीन बड्या नेत्यांची नावे चर्चेत

Ajit Pawar Plane Crash: विमान अपघाताचा २२ पानांचा प्राथमिक अहवाल आला; ब्लॅक बॉक्समध्ये काय आढळलं? विमान झाडावर कोसळलं अन्...

SCROLL FOR NEXT