मुंबई

आयआयटी मुंबईच्या ६४व्या दीक्षांत दीक्षांत सोहळ्यात, ४३० विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान

CD

४३० विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान
आयआयटी मुंबईचा ६४वा दीक्षान्त सोहळा
मुंबई, ता. २८ : आयआयटी मुंबईच्या दीक्षान्त सभागृहात ६४व्या दीक्षान्त सोहळ्यात ऑगस्ट २०२५ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान विविध अभ्यासक्रमांच्या पदवीचे शिक्षण पूर्ण केलेल्या ४३० विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. ज्यामध्ये २६९ पीएचडी पदव्या (एमटेक/एमएससी/एमफिल + पीएचडी अशा द्वैतीय पदव्यांसह) समाविष्ट होत्या. याशिवाय विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत १६१ पदव्या प्रदान करण्यात आल्या. ज्यात ४४ एक्झिक्युटिव्ह एमबीए पदव्यांचा समावेश आहे.
या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी मोतीलाल ओसवाल उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आयआयटीच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे कार्यवाहक अध्यक्ष डॉ. शरद कुमार सराफ यांनी भूषवले, तर आयआयटीचे संचालक प्रा. शिरीष केदारेंनी औपचारिकरीत्या पदव्या प्रदान केल्या.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संबोधित करताना प्रमुख पाहुणे मोतीलाल ओसवाल म्हणाले, “तुम्ही अशा काळात पदवीधर होत आहात, जेव्हा तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवोपक्रम जगाला नव्याने आकार देत आहेत. ही तुमच्यासाठी निर्माण, नेतृत्व आणि अर्थपूर्ण योगदान देण्याची मोठी संधी आहे. स्वतःमध्ये गुंतवणूक करा, जिज्ञासू राहा, नैतिक नेतृत्वाचा अवलंब करा आणि लक्षात ठेवा की खरे यश म्हणजे करिअर, आरोग्य, नाती आणि अंतर्गत शांतता यांचा संतुलित विकास होय. माझा जीवनमंत्र आहे ‘शिका, कमवा आणि परत द्या’ असे ते म्हणाले.
आयआयटीचे संचालक प्रा. शिरीष केदारे म्हणाले, “आमचे पदवीधर केवळ मजबूत तांत्रिक पायाभूत ज्ञानानेच नव्हे, तर चिकित्सक विचार, नवोपक्रम आणि जबाबदारीने नेतृत्व करण्याच्या क्षमतेने सुसज्ज आहेत. त्यांच्या व्यावसायिक आणि शैक्षणिक प्रवासासाठी आम्ही त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो.” या समारंभाला वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी, सेंट लुईस (अमेरिका) येथील पदव्युत्तर शिक्षण व आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाचे वरिष्ठ उप-प्रोव्होस्ट प्रा. विजय रमणी, पदवीधर विद्यार्थी, प्राध्यापक, तसेच अभिमानी कुटुंबीय व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CIDCO Lottery: नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सिडकोने गृहनिर्माण योजनेची अंतिम मुदत; आता शेवटची तारीख काय?

Horoscope : नवा महिना, नवा राजयोग! उद्या 1 मार्चपासून पुढचे 4 दिवस 'या' 4 राशीच्या लोकांसाठी लकी, होणार धनलाभ

Indian Embassy in Kuwait Issues Urgent Advisory : युद्ध परिस्थितीमुळे कुवेतमधील भारतीय दूतावासाने जारी केली तातडीची सूचना, म्हटले...

Rajya Sabha Election: विदर्भातून राज्यसभेवर कोण जाणार? भाजपच्या तंबूत तीव्र लॉबिंग सुरू, 'या' तीन बड्या नेत्यांची नावे चर्चेत

Ajit Pawar Plane Crash: विमान अपघाताचा २२ पानांचा प्राथमिक अहवाल आला; ब्लॅक बॉक्समध्ये काय आढळलं? विमान झाडावर कोसळलं अन्...

SCROLL FOR NEXT