मुंबई

मध्य आशियात अमेरिका इराण युद्ध मुंबईतील ५७ विमान सेवाना फटका

CD

मुंबईतील ५७ विमानसेवांना फटका
युद्धजन्य परिस्थितीमुळे येणारी २४ आणि जाणारे ३३ विमाने रद्द

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : मध्य आशिया अमेरिका-इस्राइल आणि इराण यांच्यातील तीव्र सैन्य संघर्षाने जागतिक विमान वाहतुकीला फटका बसला आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून भारतातील प्रमुख विमान कंपन्या एअर इंडिया आणि इंडिगो यांनी आखाती देशांसाठीच्या सर्व उड्डाणांवर तत्काळ बंदी घातली. मात्र, या युद्धाचा मुंबईतील ५७ विमानसेवांना फटका बसला असून, सायंकाळी ५.४५ पर्यंत येणारी २४ आणि जाणारी ३३ विमाने रद्द झाली.
शनिवारी (ता. २८) तणाव शिगेला पोहोचला, जेव्हा अमेरिका व इस्राइलने ‘ऑपरेशन एपिक फ्यूरी’अंतर्गत इरानमधील रणनीतिक ठिकाणांवर संयुक्त हल्ले केले. प्रत्युत्तरात इरानने क्षेपणास्त्रांनी यूएई, बहरीन व सौदी अरेबियाच्या काही भागांत हल्ले केले. असुरक्षित हवाई क्षेत्रामुळे भारतीय विमान कंपन्यांनी प्रवासी व चालक दलाच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलले. एअर इंडिया व इंडिगोचे अधिकृत निवेदन जारी केले आहे. एअर इंडियाने जाहीर केले, ‘‘मिडिल ईस्टमधील बिकट परिस्थितीमुळे खाडीतील सर्व गंतव्यांसाठी उड्डाणे निलंबित केली आहेत. सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे.’’ तसेच कंपनीने अमेरिका-युरोप मार्गावरील लाँग-हॉल उड्डाणांचेही मार्ग बदलले. तर इंडिगोने सांगितले की, ‘‘इराण व परिसरातील हवाई प्रतिबंधांमुळे मध्यरात्रीपर्यंत सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. आमची टीम सतत निरीक्षण करत आहे.
दरम्यान, दुबई, अबू धाबी, दोहा, जेद्दा, रियाद येथे अडकलेल्या हजारो भारतीय प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. विमान कंपन्यांनी पूर्ण रिफंड किंवा शुल्काविना रीशेड्यूलिंगचा पर्याय दिला. स्पाइसजेटनेही दुबई उड्डाणांवर इशारा दिला आहे. परिस्थिती सुधरेपर्यंत प्रवाशांनी पर्यायी मार्ग शोधावे, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Cancel : आखाताकडे जाणारी तीन विमाने पुण्यातून रद्द

Latest Marathi News Live Update : ४ कोटींहून अधिक किमतीचा मुद्देमाल मूळ मालकांना परत

CIDCO Lottery: नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सिडकोने गृहनिर्माण योजनेची अंतिम मुदत; आता शेवटची तारीख काय?

Horoscope : नवा महिना, नवा राजयोग! उद्या 1 मार्चपासून पुढचे 4 दिवस 'या' 4 राशीच्या लोकांसाठी लकी, होणार धनलाभ

Indian Embassy in Kuwait Issues Urgent Advisory : युद्ध परिस्थितीमुळे कुवेतमधील भारतीय दूतावासाने जारी केली तातडीची सूचना, म्हटले...

SCROLL FOR NEXT