मुंबई

ई-चालान संपात मालवाहतूक आणि शाळेय बस संघटना सहभागी होणार

CD

ई-चलानविरोधात गुरुवारी संप
मालवाहतूक, शालेय बस संघटनांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : महाराष्ट्र ट्रान्स्पोर्टर्स अ‍ॅक्शन कमिटीच्या गुरुवार (ता. ५)पासून सुरू होणाऱ्या ई-चलानविरोधातील संपाला आता मुंबईची सर्वांत मोठी ट्रान्स्पोर्ट संघटना बॉम्बे गुड्स ट्रान्स्पोर्ट असोसिएशन (बीजीटीए) आणि महाराष्ट्र स्कूल बस ओनर्स असोसिएशननेही पूर्ण पाठिंबा दिला आहे. यामुळे मुंबईत मालवाहतूक आणि विद्यार्थ्यांच्या शालेय वाहतुकीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
ई-चलान प्रणालीतील त्रुटींमुळे वाहनमालक त्रस्त झाले आहेत. कायदेशीर प्रक्रिया न पाळता ९० दिवसांत कोर्टात केस न पाठवणे, अस्पष्ट फोटोंवर दंड लावणे, स्कूल बससह ट्रक, टॅक्सी, ऑटो रिक्षा आणि अवजड वाहनांवर जाचक दंड आकारणे, यावर वाहनचालकांची नाराजी आहे.
बीजीटीएने आज व्यवस्थापकीय समितीच्या बैठकीत एकमताने संपाला पाठिंबा दिला. संघटनेचे अध्यक्ष महावीर गुप्ता म्हणाले, की हा संप बेकायदा ई-चलान, अवास्तव दंड, वाहन फिटनेससाठी विलंब आणि ट्रक ऑपरेशन्समधील अडचणीविरोधात आहे. आमच्या सहभागामुळे देशभरातील मालवाहतुकीवर परिणाम होईल. तसेच जेएनपीएतील कार्गोला त्याचा फटका बसेल. तर ट्रॅफिक पोलिसांना लक्ष्य दिल्याने ट्रकला लक्ष केले जाते, असेही त्यांनी सांगितले.
==
ई-चलान व्यवस्थेतील त्रुटी आणि अन्यायकारक दंडांविरोधात वाहतूकदारांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून राज्यभर संप जाहीर केला आहे. यात स्कूल बस ओनर्स असोसिएशनही सहभागी होणार आहे.
- अनिल गर्ग, अध्यक्ष, स्कूल बस ओनर्स असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vedanta Share: एका दिवसात Vedanta कंपनीचे शेअर्स तब्बल 62 टक्यांनी घसरले! नेमकं कारण काय?

DJ Noise Incident : लग्नाच्या वरातीतील डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा, १४० कोंबड्यांचा तडफडून मृत्यू

Latest Marathi News Live Update : विधान परिषद निवडणुकीबाबत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्यांची बैठक

Congress MLC Candidate Maharashtra : तीन वाजेपर्यंत थांबा काँग्रेसचा उमेदवार समजेल, नाना पटोले स्पष्टच म्हणाले; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवरही भाष्य

Bank News: कामाची बातमी! 1 मे ला बँका बंद की सुरू? RBI ची मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT