जोगेश्वरी पीएमजीपी पुनर्विकासाला वेग
म्हाडा आठवडाभरात रहिवाशांसोबत करणार करारनामा; मसुदा तयार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : जोगेश्वरीच्या पीएमजीपी वसाहतीचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून केला जाणार आहे. त्यासाठी आठवडाभरात म्हाडा संबंधित रहिवाशांसोबत पुनर्विकसित इमारतीत कायमस्वरूपी घर देण्याबाबतचा करारनामा (पीएएए) करणार आहे. त्यामुळे पुनर्विकासित इमारतीत रहिवाशांना कशाप्रकारे घर दिले जाईल, त्यामध्ये काय सुविधा असतील याबाबतची माहिती मिळणार आहे. त्यासाठी म्हाडाने नुकताच पीएएएच्या कराराच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे.
१९९०च्या दशकात पंतप्रधान अनुदान प्रकल्पांतर्गत जोगेश्वरी पीएमजीपी वसाहत उभारली असून, त्यामध्ये चारमजली १७ इमारती आहेत. त्यानुसार ९४२ निवासी आणि ४२ अनिवासी असे एकूण ९८४ गाळे आहेत. सरकारच्या मंजुरीने या वसाहतीचा पूर्णविकास म्हाडा करणार आहे. त्यासाठी ईपीसी कंत्राटदार म्हणून बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन या कंपनीची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, पुनर्विकासाला सुरुवात करण्यापूर्वी आणि सध्याची घरे रिकामी करण्यापूर्वी पर्मनंट अल्टरनेट ॲकोमोडेशन ॲग्रीमेंट हा करारनामा करणे महत्त्वाचे असते.
गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकासात विकसक आणि सभासद यांच्यात होणारा अत्यंत महत्त्वाचा कायदेशीर करार असतो. त्यामुळे नवीन फ्लॅटचा आकार, भाडे, सुविधा आणि ताबा देण्याची तारीख निश्चित करीत असल्याने जुने घर रिकामे करण्यापूर्वी सभासदांच्या हक्कांचे कायदेशीर संरक्षण होते. त्यामुळे हा करार आठवडाभरात केला जाणार असून, त्याबाबतच्या मसुद्याला म्हाडाने मंजुरी दिली आहे. परिणामी पीएमजीपी वसाहतीच्या पुनर्विकासाला वेग येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मे महिन्यात काम सुरू होणार
म्हाडाकडून लवकरच रहिवाशांसोबत पुनर्विकासाबाबतचा करार केला जाणार आहे. तसेच याच महिन्यात भाडे देण्यास सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे रहिवाशांनी एप्रिलमध्ये आपली घरे रिकामी करणे अपेक्षित आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी मे महिन्यात प्रकल्पाचे काम सुरू करण्याचे म्हाडाचे नियोजन असल्याचे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.