१५९ मद्यपी चालकांविरोधात गुन्हा
नियम मोडणाऱ्यांवर कारवाई, १.९९ कोटींचा दंड
मुंबई, ता. ३ : होळी, धूलिवंदन सण साजरा करताना वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या १६,७२७ वाहनांवर ई चलान बजावण्यात आले, तर १५९ मद्यपी चालकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.
होळी, धूलिवंदन सण साजर करताना मोठ्या प्रमाणात नागरिक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. हा अनुभव गाठीशी असलेल्या वाहतूक पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून मंगळवारी संध्याकाळ सात वाजेपर्यंत शहरात विशेष मोहीम राबवली. त्यात विविध ठिकाणी नाकाबंदी, चौक्या उभारून, बंदोबस्त ठेवून नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
या कारवाईत १५९ चालक मद्याच्या नशेत वाहन चालवताना आढळले. त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. तर सर्वाधिक कारवाया वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांवर झाल्याचे सांगण्यात आले. वेगमर्यादा ओलांडणाऱ्या ४,४८६, विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांविरोधात ४,३१७, रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या २,५३२ सिग्नल मोडणाऱ्या ६१० ट्रिपल सीट ५३० अशी एकूण १६,७२७ चलान जारी करून एकूण १.९९ कोटींचा दंड आकारण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.