पोलिस ठाण्यात गोधळ घालणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा
मुंबई, ता. ३ ः पोलिस ठाण्यात गोंधळ घालत शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. गौरव सिंग असे त्याचे नाव आहे. हा प्रकार १ मार्चला पहाटे घडला.
पोलिसांच्या माहितीनुसार गौरव व त्याची प्रेयसी खार परिसरातील एका बारमध्ये पार्टीसाठी गेले होते. तेथे त्यांच्यात वाद झाला. गौरवने प्रेयसीला शिवीगाळ व मारहाण केली. बार व्यवस्थापनाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता गौरवने त्यांनाही शिवीगाळ केली. त्यामुळे बार व्यवस्थापनाने सांताक्रूझ पोलिसांना मदतीसाठी बोलावले.
पोलिस ठाण्यात आणल्यानंतर प्रेयसीचा जबाब सुरू असताना गौरव अनियंत्रित झाला. तिला शिवीगाळ करू लागला. ठार मारण्याची धमकी देऊ लागला. तेव्हा मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांनाही त्याने शिवीगाळ केली. पोलिस ठाण्यातील साधनसामग्रीची नासधूस केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.