ग्रो गुंतवणूक ॲपकडून सर्वत्र एआयचा वापर
मुंबई, ता. ४ : ग्रो या आर्थिक गुंतवणूक-सल्ला ॲपने शेअर-म्युच्युअल फंड व्यवहार, स्थिर उत्पन्न तसेच डिजिटल संपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रात एआयचा वापर करण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार एआय समर्थित जीआर वनचा वापर करण्याची घोषणाही त्यांनी केली.
कंपनीचे सहसंस्थापक आणि सी.टी.ओ. नीरज सिंह यांनी ग्रो नेक्स्ट या कंपनीच्या माहितीपर विशेष कार्यक्रमात ही माहिती दिली. प्रत्येक गुंतवणूकदारासाठी जबाबदार बुद्धिमत्ता या संकल्पनेवर आधारित ग्रोची पुढील वाटचाल असेल, असेही ते म्हणाले.
एआय आधारित गुंतवणुकीची साधने तसेच सध्याच्या व्यवहारांच्या आधुनिक व्यवस्था, दुय्यम बाजारातील रोखे खरेदी व्यवस्था आणि डिजिटाईज संपत्ती व्यवस्थापन या सर्वांचे एकाच व्यवस्थेत एकत्रीकरण केले जाईल. त्यामुळे बाजारातील व्यवहार सोपे होतीलच, पण निर्णय प्रक्रिया अचूक होणे, पारदर्शकता आणि सुरक्षा व्यवस्था यांचाही दर्जा वाढेल. ग्रोची आय समर्थित जी. आर. वन ही गुंतवणूक आणि ट्रेडिंगला सहाय्य करणारी व्यवस्था आहे. जी. आर. वन तर्फे शेअरची छाननी केली जाते. त्या कंपनीचा व्यवसाय तसेच शेअरचे तांत्रिक मुद्दे तपासले जातात. तसेच त्याचा कलदेखील काढून त्याची माहिती दिली जाते. ही यंत्रणा वापरकर्त्याचे खाते, त्याला अपेक्षित शेअरची यादी आदींशी समन्वय साधून त्यांना माहिती देते. अर्थात ग्राहकाच्या परवानगीनंतरच ही व्यवस्था कार्यान्वित होते. या व्यवस्थेत एआय सुरक्षेचे अनेक टप्पे असल्यामुळे गुंतवणूकदारांची सुरक्षितता सर्वोच्च स्थानी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे अवैध किंवा धोकादायक व्यवहारांनाही आळा बसतो.
त्याचप्रमाणे सतत व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठीही ग्रोने ९१५ या आधुनिक ट्रेडिंग टर्मिनलचा विस्तार केला आहे. आता त्यात मोठ्या रकमेच्या व्यवहारांची व्यवस्था, संभाव्य नफा तोटा आधीच मोजणारी यंत्रणा आणि वस्तूंचे चार्ट हे सर्व पाहता येईल. त्याचप्रमाणे कंपनीने एफ अँड ओ प्रकारातही जास्तीच्या सुरक्षिततेचे उपाय आणले आहेत. तोटे टाळण्यासाठी यात व्यवस्थित देखरेख आणि पर्यायी व्यवहाराच्या किमतीत कुलूपबंद भाव अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.