मुंबई

व्हॉट्सॲप चॅट घटस्फोटाचे कारण असू शकत नाही - उच्च न्यायालय

CD

व्हॉट्सॲप चॅट घटस्फोटाचे कारण असू शकत नाही
उच्च न्यायालयाकडून प्रकरण पुन्हा नाशिक न्यायालयाकडे वर्ग
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : केवळ व्हॉट्सॲप चॅटच्या आधारे पती किंवा पत्नीला बाजू मांडण्याची संधी न देता कथित कौटुंबिक क्रूरतेच्या कारणावरून घटस्फोट मंजूर करता येणार नाही, असे निरीक्षण नुकतेच उच्च न्यायालयाने नोंदवले. तसेच नाशिक जिल्हा कुटुंब न्यायालयाने दिलेला घटस्फोटाचा आदेश रद्द केला.

पतीने सादर केलेल्या व्हॉट्सॲप चॅटच्या पुराव्याला पत्नीला प्रतिदावा किंवा बाजू मांडण्याची संधी कुटुंब न्यायालयाने दिली नाही. केवळ व्हॉट्सॲप चॅटवर अवलंबून राहून घटस्फोटाचा आदेश मंजूर करता येत नाही. कारण तो प्रमुख पुराव्यांद्वारे सिद्ध होत नाही, असे निरीक्षण न्या. भारती डांगरे आणि न्या. मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाने मागील आठवड्यात नाशिक जिल्हा कुटुंब न्यायालयाने दिलेला घटस्फोटाचा आदेश रद्द करताना नोंदवले.
हे प्रकरण पुन्हा नाशिक कौटुंबिक न्यायालयाकडे पाठवले, जेणेकरून पत्नीला बाजू मांडण्याची आणि पुरावे सादर करण्याची संधी मिळेल. कुटुंब न्यायालयाने प्रकरणावर नव्याने सुनावणी घेताना विभक्त होऊ पाहणाऱ्या या जोडप्याला मध्यस्थीद्वारे तोडगा काढण्याची शक्यताही पडताळून पाहावी, असेही खंडपीठाने आदेशात नमूद केले.

काय प्रकरण?
याचिकाकर्त्या पतीने कौटुंबिक क्रूरतेच्या कारणास्तव नाशिक जिल्हा कौटुंबिक न्यायालयाकडे केलेला अर्ज न्यायालयाने स्वीकारला आणि घटस्फोट मंजूर केला. त्या निर्णयाला पत्नीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आपली बाजू न ऐकता हा एकतर्फी आदेश देण्यात आल्याचा दावा पत्नीने याचिकेत केला होता. कुटुंब न्यायालयाने पतीने सादर केलेल्या व्हॉट्सॲप चॅटचा आधार घेतला होता. त्या चॅटमध्ये पत्नीने नाशिकहून पुण्यात वेगळे राहण्याची मागणी केली होती. तसेच सासू आणि नणंदेविरोधात कथितरीत्या अवमानकारक वक्तव्ये केली होती.

कुटुंब न्यायालयाचे निरीक्षण
प्रतिवादी पत्नीने व्हॉट्सॲप चॅटमध्ये दबाव, भावनिक धमकी देऊन सासू आणि मेहुण्याविरुद्ध अपमानास्पद टिप्पण्या केल्या होत्या. त्यामुळे पतीवर कौटुंबिक क्रूरता करण्यात आल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे पतीला घटस्फोट देण्याचा अधिकार असल्याचे कुटुंब न्यायालयाने नमूद केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित शर्मा, विराट कोहली यांची हवा! भारतीय क्रिकेटमध्ये सात वर्षांत जे कधी नाही घडले, ते होणार; चाहत्यांसाठी मेजवानी...

Sharad Pawar: निर्णय झाला! काँग्रेसचं शरद पवारांच्या नावाला समर्थन; एका जागेवरुन 'या' नेत्यांमध्ये सुरु होती रस्सीखेच

Shivneri Bus: एसटीची ‘शिवनेरी’ बस आता राज्यभर धावणार! स्लीपर कोचची एंट्री; कुठून कुठे जाणार? प्रताप सरनाईकांनी सांगितली यादी

Agricultural News : कांदा पुन्हा युद्धात भरडला! इराण-इस्रायल वादामुळे १६ हजार टन कांदा 'होर्मुझ'च्या वाटेत अडकला

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणी आयव्हीएफ सेंटर सील

SCROLL FOR NEXT