मुंबई

रक्तपेढ्यांच्या खासगीकरणाबाबत योग्य निर्णय घ्या

CD

रक्तपेढ्यांच्या खासगीकरणाबाबत योग्य निर्णय घ्या
महापौर रितू राजेश तावडे यांचे प्रशासनाला निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांतील रक्तपेढ्यांचे कामकाज खासगी संस्थांकडे सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर सोपवण्याच्या प्रस्तावावर पुनर्विचार करावा, असे निर्देश महापौर रितू राजेश तावडे यांनी प्रशासनाला दिले आहेत. यासंदर्भात अखिल पार्कसाईट सेवा संघाचे सुनील काजरोळकर यांनी दिलेले निवेदन अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले आहे.
वांद्रे भाभा, राजावाडी, कांदिवली शताब्दी, कुर्ला भाभा, एम. टी. अग्रवाल आणि भगवती या सहा महापालिका रुग्णालयांतील रक्तपेढ्या पीपीपी तत्त्वावर चालविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याची माहिती आहे. राज्यभरातून रुग्ण उपचारासाठी या रुग्णालयांमध्ये दाखल होत असतात. गरजू रुग्णांना तातडीने आणि मोफत रक्त उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या रक्तपेढ्यांमार्फत केले जाते. अशा परिस्थितीत खासगीकरण झाल्यास आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वेळेवर रक्त मिळण्याबाबत अनिश्चितता निर्माण होऊ शकते, अशी भीती अखिल पार्कसाईट सेवा संघाचे सुनील काजरोळकर यांनी व्यक्त केली आहे.

सर्वांगीण विचार करा!
निवेदनातील मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेऊन नियमानुसार योग्य ती कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश महापौरांकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे पीपीपी तत्त्वावर कोणत्या सेवा ठेवण्याची गरज आहे आणि कोणत्या नको, याबाबत विचार करण्याची गरज असल्याचे मत व्यक्‍त होत आहे. सार्वजनिक आरोग्यसेवेशी संबंधित या निर्णयाचा सर्वांगीण विचार करूनच पुढील पाऊल उचलावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sukhoi Missing: मोठी बातमी! भारतीय वायुसेनेचं अत्यंत शक्तिशाली सुखोई फायटर जेट बेपत्ता; शोध मोहीम सुरु

Pune News : भाजप नगरसेवकांच्या निर्णयामुळे केंद्राच्या प्रकल्पाला अडथळा, ८ कोटींचा निधी परत जाण्याची शक्यता

T20 WC, IND vs ENG: अक्षर पटेल मागे पळाला अन् सूर मारत अफळातून कॅच पकडला, गंभीरही खूश अन् बुमरहाचाही मोठा विक्रम

T20 WC, IND vs ENG SF: ३७ चौकार-षटकार… वर्ल्ड कप नॉक आऊटमधील सर्वोच्च धावसंख्या... संजू सॅमसनने हिटमॅन रोहितचा विक्रम मोडला, भारताचे ७ जबरदस्त विक्रम...

Alandi News : आळंदी इंद्रायणी घाटावर महिलांमार्फत खुलेआम मद्यविक्री, धार्मिक स्थळांचे विडंबन

SCROLL FOR NEXT