मुंबई

पीसीएम व पीसीबी सीईटी प्रवेश परीक्षेसाठी दोन्ही संधी मिळून ११ लाख ४२ हजार विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार

CD

पीसीएम, पीसीबीसाठी ११ लाख ४२ हजार विद्यार्थी
अर्जातील दुरुस्तीसाठी ७ मार्चपर्यंत ऑनलाइन सुविधा उपलब्ध
मुंबई, ता. ४ : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६ मधील शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी, फार्मसी, बी. प्लॅनिंग, एम. प्लॅनिंग (इंटिग्रेटेड) व ॲग्रीकल्चर एज्युकेशन या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या एमएचटी सीईटी पीसीएम समूह व पीसीबी समूह सीईटी प्रवेश नोंदणी २७ फेब्रुवारीला संपली. आता या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या नोंदणी अर्जामध्ये जर काही दुरुस्त्या असतील, तर त्यासाठी ५ मार्च ते ७ मार्च यादरम्यान ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यावर्षी प्रथमच पीसीएम व पीसीबी समूहासाठी प्रवेश परीक्षेच्या दोन संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. या दोन्ही संधी मिळून ११ लाख ४२ हजार ६१० विद्यार्थी ही प्रवेश परीक्षा देणार आहेत.


दुरुस्तीसाठी ऑनलाइन सुविधा
पीसीएम व पीसीबी समूहाच्या या सामाईक प्रवेश परीक्षेकरिता ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी प्रक्रिया परीक्षा शुल्क अदा करून पूर्ण केली आहे. त्यापैकी काही विद्यार्थांकडून अर्ज भरताना अनवधानाने काही चुका झाल्या असतील, तर त्या दुरुस्तीसाठीची ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही दुरुस्तीची सुविधा ५ मार्च ते ७ मार्च यादरम्यान उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःच्या लॉगीनमध्ये जाऊन ही दुरुस्ती करावयाची आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने भरलेल्या अर्जात त्याचे नाव, जन्मतारीख, छायाचित्र, सही, लिंग, पीसीएम किंवा पीसीबी समूह समाविष्ट करणे, दुसरी संधी समाविष्ट करणे यामध्ये दुरुस्ती व बदल करण्याची सुविधा देण्यात येत आहे.

दोन्ही संधीच्या प्रवेश परीक्षेच्या तारखा
यानुसार एमएचटी सीईटी (पीसीएम समूह) पहिल्या संधीची प्रवेश परीक्षा ११ एप्रिल ते १९ एप्रिल २०२६ दरम्यान होणार आहे, तर दुसऱ्या संधीची प्रवेश परीक्षा १४ मे ते १७ मे २०२६ दरम्यान होणार आहे. एमएचटी सीईटी (पीसीबी समूह) पहिल्या संधीची प्रवेश परीक्षा २१ एप्रिल ते २६ एप्रिल २०२६ दरम्यान घेतली जाणार आहे, तर दुसऱ्या संधीची प्रवेश परीक्षा १० मे ते ११ मे २०२६ दरम्यान होणार आहे. ही सीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संगणकाधारित पद्धतीने ऑनलाइन घेतल्या जातील.

११ लाख ४२ हजार ६१० विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार
यावर्षी पीसीएम व पीसीबी समूहाच्या या दोन्ही सीईटीसाठी पहिल्या संधीसाठी सात लाख ५५ हजार ०२९ विद्यार्थ्यांची नोंदणी केली आहे. दोन्ही सीईटीसाठी दुसऱ्या संधीची नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तीन लाख ८७ हजार ५८१ आहे. दोन्ही संधी मिळून ११ लाख ४२ हजार ५१० विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार आहेत. यावर्षी पीसीएम समूहाच्या सीईटीच्या पहिल्या संधीला चार लाख ७४ हजार ६५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दुसऱ्या संधीला दोन लाख ८६ हजार ३२५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, तर दोन्ही संधी मिळून पीसीएम समूहाच्या सीईटीला सात लाख ६० हजार ९८१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तसेच पीसीबी समूहाच्या सीईटीच्या पहिल्या संधीला दोन लाख ८० हजार ३७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दुसऱ्या संधीला एक लाख एक हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, तर दोन्ही संधी मिळून पीसीबी समूहाच्या सीईटीला तीन लाख ८१ हजार ६२९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

पीसीएम समूहाच्या नोंदणीमध्ये १० हजाराने वाढ
प्रवेश नोंदणीमध्ये पीसीएम समूहाची नोंदणी मागील वर्षापेक्षा जास्त झाली असून, २०२५ च्या एमएचटी सीईटी (पीसीएम समूह) या प्रवेश परीक्षेमध्ये ४,६४,२६२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यावर्षी ही नोंदणी पहिल्या संधीसाठी ४,७४,६५६ झाली आहे. ही वाढ १०,३९४ ने जास्त आहे, तर एमएचटी सीईटी (पीसीबी समूह) या प्रवेश परीक्षेमध्ये ३,०१,०७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या अभ्यासक्रमांसाठीची सीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संगणकाधारित पद्धतीने ऑनलाइन घेतल्या जातील.

चार वर्षांत प्रवेश परीक्षेस नोंदणी केलेले विद्यार्थी
• एमएचटी सीईटी (पीसीएम समूह)
* २०२३-२४ : ३,१३,७३१
* २०२४-२५ : ३,७९,७९४
* २०२५-२६ : ४,६४,२६२
* २०२६ - २७ : ७,६०,९८१
(दोन्ही संधी मिळून)

• एमएचटी सीईटी (पीसीबी समूह)
* २०२३-२४ : २,७७,४०१
* २०२४-२५ : २,९५,५७७
* २०२५-२६ : ३,०१,०७३
* २०२६ - २७ : ३,८१,६२९
(दोन्ही संधी मिळून)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित शर्मा, विराट कोहली यांची हवा! भारतीय क्रिकेटमध्ये सात वर्षांत जे कधी नाही घडले, ते होणार; चाहत्यांसाठी मेजवानी...

Sharad Pawar: निर्णय झाला! काँग्रेसचं शरद पवारांच्या नावाला समर्थन; एका जागेवरुन 'या' नेत्यांमध्ये सुरु होती रस्सीखेच

Shivneri Bus: एसटीची ‘शिवनेरी’ बस आता राज्यभर धावणार! स्लीपर कोचची एंट्री; कुठून कुठे जाणार? प्रताप सरनाईकांनी सांगितली यादी

Agricultural News : कांदा पुन्हा युद्धात भरडला! इराण-इस्रायल वादामुळे १६ हजार टन कांदा 'होर्मुझ'च्या वाटेत अडकला

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणी आयव्हीएफ सेंटर सील

SCROLL FOR NEXT