मुंबई

ई-चलानाबाबत चर्चा निष्फळ

CD

ई-चलानबाबत चर्चा निष्फळ

वाहतूकदार आंदोलनावर ठाम

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : ई-चलानच्या प्रश्नावर वाहतूकदारांनी गुरुवारी (ता. ५) आंदोलनाचा इशारा आहे. या पार्श्वभूमीवर ताेडगा काढण्यासाठी परिवहन आयुक्तांनी आज बैठक बोलावली होती. या बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटीच्या वतीने देण्यात आला आहे.

राज्य सरकार या विषयाकडे गांभीर्याने पाहात नाही. राज्यातील सुमारे १५ लाख वाहतूकदार आणि लाखो खासगी वाहनचालकांशी संबंधित हा प्रश्न असून, जवळपास साडेचार हजार कोटी रुपयांच्या दंडाचा विषय प्रलंबित आहे. इतक्या मोठ्या आर्थिक भाराबाबत स्पष्ट भूमिका न घेतल्याने वाहतूकदारांमध्ये नाराजी आहे.

महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटीच्या वतीने गुरुवारपासून राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्याची घाेषणा केली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयावर हे आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईत सकाळी ११ वाजता आझाद मैदान येथे मुख्य आंदोलन होणार असून, या आंदोलनात रिक्षा, टॅक्सी, बस, ट्रकचालक आणि इतर सर्व वाहतूकदार सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs MI Live: मुंबई इंडियन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड! चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ढेपाळले, पण जगात चमकले; भारतीय संघालाही हे नाही जमले...

Success Story : जिद्दीला सलाम! दोन मुलांचा सांभाळ अन् मोलमजुरी करत निशाने केली 12वी उत्तीर्ण; मिळवले ६८.३३% गुण

Judge Suicide: धक्कादायक! न्यायाधीशांनी जीवन संपवलं; मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, घटनेनं खळबळ

Yerla River Incident : लग्नासाठी आली अन् काळानं घाला घातला! येरळा नदीत पोहण्यास गेलेल्या 20 वर्षीय तरुणीचा बुडून मृत्यू; सात मुलांना पाण्याबाहेर काढण्यात यश

CSK vs MI Live: पुण्याच्या पोराने कमाल केली! आधी अफलातून झेल टिपला, नंतर सूर्यकुमार यादवची विकेट घेत दिला तगडा झटका Video

SCROLL FOR NEXT