मुंबई

राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना

CD

जनआरोग्य योजना मिशन मोडवर
कार्यान्वित करावी ः आबिटकर

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे,  उपजिल्हा रुग्णालये व जिल्हा रुग्णालयांनी महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट असलेले उपचार मिशन मोडवर सुरू करावेत, अशा सूचना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या आहेत .

मुंबईतील ‘सुरुची’ शासकीय निवासस्थानात महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे अधिकारी व आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या वेळी आरोग्यमंत्री म्हणाले, सरकारी दवाखान्याच्या माध्यमातून जनआरोग्य योजना राबवल्या गेल्या पाहिजेत. त्यामुळे शासनाचे पैसे सरकारी रुग्णालयाला मिळतील. या निधीच्या माध्यमातून सरकारी रुग्णालयाचे सक्षमीकरण होण्याबरोबरच डॉक्टरांनाही अधिक चांगला प्रोत्साहन भत्ता मिळेल. यापूर्वी जनआरोग्य योजनेशी संलग्नित झालेल्या रुग्णालयांचा सहा महिन्यांतील प्रगतीचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही आरोग्यमंत्र्यांनी या वेळी दिल्या.

न्यूरो,  कॅन्सर आणि ऑर्थो (अस्थिरोग) यासारख्या गंभीर आजारांच्या उपचारांसाठी वाढीव पॅकेज देणेबाबत तसेच, पेट स्कॅन सारख्या अत्याधुनिक सुविधांसाठी सामंजस्य करार करण्याच्या सूचनाही या वेळी देण्यात आल्या आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या जिल्हा समन्वयकांनी  अधिक सक्रिय होऊन काम करावे. स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार,  खासदार तसेच जिल्हा शल्यचिकित्सक,  जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी सतत संपर्कात राहून योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी. महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानी क्षेत्रीय भेटी देऊन योग्य सनियंत्रण करावे. रुग्णालयांना मिळणाऱ्या कॉर्पस फंडचा विनियोग रुग्णालयातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी,  औषध खरेदीसाठी आणि डॉक्टरांच्या प्रशिक्षणासाठी खर्च कराव्यात. त्यासाठी एक समिती स्थापन करून,  एसओपी तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शासकीय रुग्णालयांनी स्वतःच्या पायावर उभे राहून दर्जेदार आरोग्यसेवा देणे अपेक्षित असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेची व्यापक प्रसिद्धी करावी योजनेच्या माहिती देणाऱ्या टोल फ्री नंबर सर्वत्र प्रदर्शित करावेत, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. बैठकीस महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अण्णासाहेब चव्हाण, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर,  संचालक पुणे डॉ. विजय कंदेवाड यांचेसह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Mumbai Expressway Accident : सीएनजी लिक होऊन धावती कार पेटली; वैष्णोदेवी दर्शनाहून परतणाऱ्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

IPL 2026 : दोन मॅच, जिथे मुबंई इंडियन्सने माती खाल्ली! R Ashwin ने पोलखोल केली; म्हणाला, आता सर्व ६ सामने जिंकणे अशक्य

Latest Marathi News Live Update : राज्यभरात उष्माघाताच्या 115 रुग्णांची नोंद

CBSE Parenting Calendar 2026-27: मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नवा उपक्रम; सुजाण पालकत्वासाठी 'सीबीएसई'कडून पालकांसाठी मार्गदर्शक दिनदर्शिका जाहीर

Gold Rate Today: एप्रिलमध्ये सोनं स्थिर! आता महागणार का? खरेदीदारांनी काय करावं?

SCROLL FOR NEXT