मुंबई

एकात्मता, अध्यात्म आणि राष्ट्रीय भावनेतून रक्तदान जनजागृतीला नवी दिशा - अ‍ॅन आर्ट गॅलरी फॉर नोबल कॉज ऑफ ब्लड डोनेशन’ संकल्पना

CD

रक्तदान जनजागृतीला नवी दिशा
‘अ‍ॅन आर्ट गॅलरी फॉर नोबल कॉज ऑफ ब्लड डोनेशन’ संकल्पना

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद यांनी स्वेच्छा रक्तदानाला चालना देण्यासाठी ‘अ‍ॅन आर्ट गॅलरी फॉर नोबल कॉज ऑफ ब्लड डोनेशन’ ही संकल्पना राबविली आहे. एकात्मता, अध्यात्म, धार्मिक समन्वय आणि राष्ट्रीय कर्तव्यभावना यांचा संगम साधत रक्तदानाबाबत जनजागृती करण्यावर भर देण्यात आला आहे.

‘करू या श्री गणेशा रक्तदानाचा’, ‘दानाचे नव्हे त्यागाचे असे, कार्य सर्व महाभागांचे असे’, ‘हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, सर्वांना रक्त आवश्यक आहे भाऊ’, तसेच ‘धर्माच्या नावावर का करता रक्ताचा सडा, हेच रक्त दान करून उपयोगी पाडा’ अशा हृदयस्पर्शी आणि विचारप्रवर्तक घोषवाक्यांमधून समाजाला साद घालण्यात आली आहे.
या संकल्पनेतील आध्यात्मिक आणि ओवीबद्ध कविता परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. पुरुषोत्तम पुरी यांनी रचल्या आहेत. अभंग, भारूड आणि काव्यपरंपरेचा अभ्यास असलेल्या डॉ. पुरी यांनी रक्तदानाच्या विषयाला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संदर्भ जोडले आहेत.
‘जसे जलाविना मासे, जसे पाण्याविना रोपटे, तसे रक्ताविना मानव’ या ओळींतून रक्ताचे जीवनावश्यक महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. ‘रक्ताचिये बळे, चाले जीवनाचे बाहुले’ या काव्यमय संदेशातून जीवनचक्र रक्तावर अवलंबून असल्याचे प्रभावीपणे मांडले आहे. धर्म, जात, पंथ यांच्या पलीकडे जाऊन मानवतेच्या नात्याची जाणीव करून देत रक्तदान हे एकात्मतेचे प्रतीक असल्याचा संदेश या पोस्टर्समधून देण्यात आला आहे.

डॉ. पुरी यांनी गेल्या ३० वर्षांच्या अनुभवातून तयार केलेली ही पोस्टर्स मालिका राज्यातील रक्तपेढ्यांना मार्गदर्शक ठरत आहे. एखादी व्यक्ती रक्तदान करते म्हणजे तिच्यातील अध्यात्म जागृत होते. दानापेक्षा मोठे पुण्य काय असू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. पारंपरिक आवाहनांच्या पलीकडे जाऊन माहिती, शिक्षण आणि संवाद या माध्यमांतून सर्जनशील जनजागृती करणे, ही काळाची गरज असल्याचे ते सांगतात. स्वेच्छा रक्तदान चळवळीला नवा वेग देण्यासाठी ‘आर्ट गॅलरी’ संकल्पना प्रभावी ठरेल, असा विश्वास परिषदेने व्यक्त केला आहे.
---
राज्यात अनेकदा तातडीच्या प्रसंगी रक्तसाठ्याची कमतरता भासते. अशा वेळी नियमित आणि नियोजनबद्ध स्वेच्छा रक्तदान हीच शाश्वत उपाययोजना ठरते. रक्तदानाबाबत अजूनही समाजात काही गैरसमज आणि भीतीचे वातावरण आढळते. या पार्श्वभूमीवर माहितीबरोबरच भावनिक आणि मूल्याधिष्ठित संदेश देणारे हे चित्रफलक उपयुक्त ठरतील, असे मत रक्त संक्रमण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar CM: बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ! 'या' ३ कारणांमुळे नितीश कुमार CM पदावरून हटणार; नवं सरकार कधी स्थापन होणार?

Anti Conversion: मोठी बातमी! महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायद्याला मंजुरी; सक्तीचे धर्मांतर आणि लव्ह जिहादवर लगाम लागणार

Latest Marathi News Live Update :मध्य रेल्वे मुंबई विभागात विनातिकीट प्रवास करणाऱ्या १६.१६ लाख प्रवाशांकडून १.३१ कोटी रुपये दंड वसूल बंधनकारक

Nashik Water Pipeline : पंचवटीत खासगी कंपनीचा आडमुठेपणा! मुख्य पाईपलाईन फोडली, होळीच्या सणाला नागरिकांचे हाल

Teacher Mobile Ban : अध्यापनावेळी शिक्षकांच्या मोबाईल वापरास निर्बंध; हेरवाडमधील कन्या शाळेच्या व्यवस्थापन समितीचा निर्णय, मोबाईल जमा करण्याचे बंधन

SCROLL FOR NEXT