पत्रा चाळ रहिवाशांचे आजपासून उपोषण
- म्हाडाने लेखी आश्वासने पूर्ण करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : म्हाडाने सभासदांना दिलेल्या वितरण पत्रात मान्य केल्याप्रमाणे संस्थेशी नोंदणीकृत विकास करार करावा, वैयक्तिक करार करावा या मागणीसाठी गोरेगाव सिद्धार्थनगर पत्रा चाळीतील रहिवासी हे जागरूक पत्राचाळ रहिवासी समितीच्या माध्यमातून आक्रमक झाले आहेत.
उद्या (ता. ६)पासून त्यांनी साखळी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. सिद्धार्थनगरमधील आंबामाता मंदिर परिसरात रहिवासी बेमुदत साखळी उपोषण करणार आहेत.
म्हाडा आश्वासने पूर्ण करीत नसल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. आश्वासने प्रत्यक्षात येईपर्यंत नव्या घरांचा ताबा घ्यायचा नाही, असा ठरावही सिद्धार्थनगर गृहनिर्माण संस्थेच्या विशेष सर्वसाधारण बैठकीत घेण्यात आला आहे. पत्रा चाळीचा रहिवाशांना ताबा देण्यासाठी म्हाडाने नुकतेच वृत्तपत्रात आवाहन केले. परंतु पत्रा चाळ रहिवाशांनी म्हाडाच्या मनमानी कारभाराला म्हाडा कार्यालयात जाऊन तीव्र विरोध केला. म्हाडाचे कार्यकारी अभियंता तसेच मुख्य अधिकारी, मुंबई मंडळ यांना स्पष्ट सांगितले, की जोपर्यंत म्हाडा सभासदांना दिलेल्या वितरण पत्रात मान्य केल्याप्रमाणे संस्थेशी नोंदणीकृत विकास करार करीत नाही तसेच वैयक्तिक करार करीत नाही तोपर्यंत आम्ही कोणीही नव्या घरांचा ताबा घेणार नाही, अशी रहिवाशांची भूमिका आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.