मुंबई

अपघातग्रस्ताची सोनसाखळी चोरणारा अखेर गजाआड

CD

डोंबिवली : एकीकडे अपघातग्रस्ताला वाचवण्यासाठी धडपड सुरू असताना, दुसरीकडे त्याच्या असहायतेचा फायदा घेत सोन्याची साखळी चोरणाऱ्या एका नराधमाला विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे. सतीश दादा कोरे (२४) असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

डोंबिवली पश्चिमेकडील 'गरीबाचा वाडा' परिसरात राहणारे तुषार सुनील शिंदे यांचा २५ फेब्रुवारी रोजी मानकोली पुलावर भीषण अपघात झाला होता. त्यांना जखमी अवस्थेत शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यासाठी काही जणांनी मदत केली. मात्र, याच गर्दीचा फायदा घेत सतीश कोरे याने शिंदे यांच्या गळ्यातील ४२ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन लांबवली. अपघातग्रस्ताची चैन चोरीला गेल्याचे उघड होताच विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम चोपडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आजदे गाव (डोंबिवली पूर्व) येथून सतीश कोरेला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्याच्याकडून चोरीची चैन जप्त केली आहे.

Sukhoi Missing: मोठी बातमी! भारतीय वायुसेनेचं अत्यंत शक्तिशाली सुखोई फायटर जेट बेपत्ता; शोध मोहीम सुरु

Pune News : भाजप नगरसेवकांच्या निर्णयामुळे केंद्राच्या प्रकल्पाला अडथळा, ८ कोटींचा निधी परत जाण्याची शक्यता

T20 WC, IND vs ENG: अक्षर पटेल मागे पळाला अन् सूर मारत अफळातून कॅच पकडला, गंभीरही खूश अन् बुमरहाचाही मोठा विक्रम

T20 WC, IND vs ENG SF: ३७ चौकार-षटकार… वर्ल्ड कप नॉक आऊटमधील सर्वोच्च धावसंख्या... संजू सॅमसनने हिटमॅन रोहितचा विक्रम मोडला, भारताचे ७ जबरदस्त विक्रम...

Alandi News : आळंदी इंद्रायणी घाटावर महिलांमार्फत खुलेआम मद्यविक्री, धार्मिक स्थळांचे विडंबन

SCROLL FOR NEXT