मुंबई

महापालिका प्रशासन चौकशीच्या फेऱ्यात •महापालिकेच्या वरळीतील टेस्टिंग लॅबच्यारोबोटिक पार्किंग प्रकल्प टेंडरची चौकशी होणार :

CD

महापालिका प्रशासन चौकशीच्या फेऱ्यात
वरळीतील पार्किंग प्रकल्प; ई वॉर्ड ऑफिस इमारती टेंडरचीही चौकशी होणार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : महापालिकेने वरळीतील टेस्टिंग लॅबच्या जागेवर बहुमजली रोबोटिक पार्किंगसाठी काढलेल्या टेंडरबाबत तसेच ई वार्ड कार्यालय बांधकाम रेंगाळत ठेवल्याबाबत नगरविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केली. यामुळे महापालिका प्रशासन चौकशीच्या फेऱ्यात आले आहे. समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी यासंदर्भात गुरुवारी विधानसभेत तारांकित प्रश्न विचारला होता.

यावर आमदार रईस शेख यांनी सांगितले, की वरळीच्या जी साऊथ वॉर्डमधील म्युनिसिपल टेस्टिंग लॅब प्लॉटवर बहुमजली रोबोटिक पार्किंग बांधण्यासाठी महापालिकेने निविदा काढली होती. जिथे एकाच पार्किंग जागेसाठी महापालिकेला २७ लाख रुपये खर्च आला असता. प्रति १० हजार चौ. फू. दराने ही निविदा काढण्यात आली होती. यासंदर्भात तक्रार केल्यानंतर महापालिकेने निविदा रद्द केली. यासंदर्भात महापालिकेने जो खर्च केला त्याचे काय, असा प्रश्न करीत गेली चार वर्षे महापालिका प्रशासनाने जो भ्रष्ट कारभार केला, निविदा वाढवून काढल्या त्यासंदर्भात श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी आमदार रईस शेख यांनी केली.

आमदार रईस शेख म्हणाले, की मुंबईतील ई वॉर्ड कार्यालय धोकादायक जाहीर करण्यात आले. त्यामुळे दीड वर्ष हे कार्यालय वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहे. त्यामुळे कुठला अधिकारी कुठे बसतो, याची माहिती नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. या ठिकाणी एक कंत्राटदार आयकॉनिक इमारत उभारू इच्छित आहे. त्यामुळे कार्यालय बांधकाम करण्यास महापालिका प्रशासन टाळाटाळ करत आहे, असा आरोप त्यांनी केला. भाजपचे आमदार योगेश सागर यांनी मुंबई महापालिकेच्या चार वर्षांच्या प्रशासन काळाची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली. भाजपचे आमदार अमित साटम यांनी गेल्या २५ वर्षांच्या काळातील महापालिकेच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी केली.

अडचणी सोडवण्यात येतील
मंत्री माधुरी मिसाळ यांनी ई वॉर्ड कार्यालय बांधकाम प्रलंबित ठेवल्याबद्दल आणि जी साऊथ वॉर्डमध्ये पीपीपी तत्त्वावर बांधण्यात येणाऱ्या पार्किंग निविदेची नगरविकास विभागाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येईल, असे जाहीर केले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गुणवत्तापूर्ण प्रश्न आमदार रईस शेख यांचे विचारल्याबाबत विशेष कौतुक केले. यासंदर्भात आपल्या दालनात एक बैठक घेण्यात येईल आणि ई आणि जी साऊथ वॉर्डमधील अडचणी सोडवण्यात येतील, असे जाहीर केले.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बीएमसी जिंकताच भाजपची मोठी चाल! मुंबईत ८१ सदस्यीय नवी फौज तयार; टीममध्ये उत्तर भारतीयांचा बोलबाला, कुणाकडे कोणती जबाबदारी?

T20 WC, IND vs ENG SF: अभिषेक शर्मा दुसऱ्याच षटकात गेला, संजू सॅमसन म्हणालेला, अरे घाई नको करू... ! इंग्लंडच्या रणनीतीने हैराण

Kolhapur IT Park : अखेर मंत्रीमंडळ निर्णय झालाच! कोल्हापुरात शेंडा पार्कमध्ये 34 हेक्टर 36 गुंठे जागेत आयटी पार्क विकसित करण्यासाठी प्रस्ताव मंजूर

Mumbai News: सुरक्षा धर्मापेक्षा महत्त्वाची; विमानतळाजवळ नमाज पडण्याचा अधिकार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्णय

‘बायको पाहिजे’चं पोस्टर सोशल मीडियावर घालतंय धुमाकूळ; व्हायरल पोस्टर बॉय नेमका कोण ?

SCROLL FOR NEXT