मुंबई

एसटी चालक वाहकांना मद्यपान चाचणी सक्तीची

CD

एसटी बसचालक- वाहकांना मद्यपान चाचणी सक्तीची
आगारात कामावर हजर होणाऱ्या सर्व चालकांची तपासणी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : एसटी आगारात कामावर हजर होणाऱ्या सर्व चालकांची अल्कोटेस्ट मशीनद्वारे दररोज मद्यपान तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. योग्य नोंदी घेऊनच चालकांना कर्तव्यावर पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी (ता. ५) दिली. यामुळे एसटी प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे.

२५ जानेवारीला मंत्री सरनाईक यांनी मुंबईतील परळ बसस्थानकाला अचानक भेट दिली. या वेळी चालक-वाहकांच्या विश्रांतिगृहांमध्ये अनेक मद्याच्या बाटल्या आढळल्या. तसेच काही कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत असल्याचेही निदर्शनास आले होते. याची दखल घेत मंत्री सरनाईक यांनी तातडीने चौकशी समिती नेमून या प्रकरणास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. तसेच असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी कडक उपाययोजना करण्यासही सांगितले होते. त्या अनुषंगाने एसटी प्रशासनाने तीन अधिकाऱ्यांची समिती नेमून या प्रकरणाची सखोल चौकशी केली. चौकशीमध्ये दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी आवश्यक उपाययोजनाही सुचविण्यात आल्या आहेत. ही चौकशी अहवाल एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांना सादर करण्यात आला आहे. त्यांच्या निर्देशानुसार दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच समितीने सुचविलेल्या उपाययोजना तातडीने सर्व आगारांमध्ये लागू करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

नव्या उपाययोजनांनुसार आगारात कामावर हजर होणाऱ्या चालकांची वाहन परीक्षकांच्या माध्यमातून नियमित तपासणी केली जाणार आहे. तसेच वाहकांचीही ड्युटी देण्यापूर्वी अल्कोटेस्ट मशीनद्वारे तपासणी करून त्याची नोंद ठेवणे आवश्यक राहणार आहे. चालक व वाहकांची मद्यपान तपासणी झाली आहे की नाही, यावर सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक, सहाय्यक वाहतूक अधीक्षक, वाहतूक निरीक्षक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक आणि वाहतूक नियंत्रक यांनी देखरेख ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच आगार व्यवस्थापकांनीही नियमित नियंत्रण ठेवून या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. बस मार्गावर असताना चालकाने नियंत्रण कक्षात लॉगबुकची नोंद करणे बंधनकारक राहणार आहे. चालकाने नोंद केल्यानंतर त्याची पुन्हा एकदा अल्कोटेस्ट तपासणी करून योग्य नोंद घेतल्यानंतरच पुढील मार्गावर पाठविण्याची सक्ती करण्यात आली आहे. ही तपासणी नियमितपणे होत आहे की नाही, याची खात्री स्थानक प्रमुखांनी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

वेळोवेळी गोपनीय तपासणी मोहीम
याशिवाय बसस्थानक व आगार परिसरातील चालक, वाहक आणि विश्रांतिगृहांमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांचीही वेळोवेळी अल्कोटेस्ट मशीनद्वारे तपासणी करून त्याची नोंद ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. संबंधित विभागातील पालक अधिकाऱ्यांनी आगार व बसस्थानक भेटीदरम्यान या उपाययोजनांची अंमलबजावणी तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, याबाबतीत दक्षता विभागाकडून वेळोवेळी गोपनीय तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मद्यपानाचे दुष्परिणाम याबाबत प्रबोधन केले जाणार आहे. यासोबतच जिल्ह्यातील मुख्य बसस्थानक, चालक-वाहक विश्रांतिगृहे तसेच ज्या आगारांमध्ये चालक-वाहक जास्त प्रमाणात थांबतात अशा ठिकाणी मद्यपानास प्रतिबंध करण्यासाठी विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG : प्लेअर ऑफ दी मॅच पुरस्काराचा खरा मानकरी मी नाही... Sanju Samsonने विजयाचे श्रेय दिले दुसऱ्याला, मन जिंकणारे विधान; म्हणाला, तो नसता तर मी इथे उभा नसतो

ऐ बाई, बस खाली...! MS Dhoni ने जल्लोष करणाऱ्या साक्षीला का रोखले? IND vs ENG सामन्यातील सर्वात सुंदर क्षण Video Viral

T20 WC, IND vs ENG SF: टीम इंडिया फायनलमध्ये! २२ वर्षीय जेकब बेथलची कडवी झुंज अपयशी, ८ मार्चला जेतेपदासाठी न्यूझीलंडला भिडणार

Sukhoi Missing: मोठी बातमी! भारतीय वायुसेनेचं अत्यंत शक्तिशाली सुखोई फायटर जेट बेपत्ता; शोध मोहीम सुरु

Pune News : भाजप नगरसेवकांच्या निर्णयामुळे केंद्राच्या प्रकल्पाला अडथळा, ८ कोटींचा निधी परत जाण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT