वाहतूकदारांचा संप स्थगित
प्रलंबित प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका ः सरनाईक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : वाहतूकदार संघटनांनी ई-चलान आणि इतर मागण्यांसाठी नियोजित राज्यव्यापी संप ५ मार्चपासून घोषित केला होता. आखाती युद्धामुळे मालवाहतूक निर्यात विस्कळित झाली आहे. संप झाल्यास वाहतूक व्यवस्थेला फटका बसू शकतो. त्यामुळे संप स्थगित करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत वाहतूकदारांनी संप स्थगित केला.
राज्यातील वाहतूकदारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र राज्याचे परिवहनमंत्री यांनी सकारात्मक भूमिका घेत लवकरच चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले आहे. विशेषतः या विषयासंदर्भात येत्या आठवडाभरात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स ॲक्शन कमिटी व विविध वाहतूक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
या बैठकीत ई-चलान प्रणाली, टोलवसुली, करप्रणाली तसेच वाहतूकदारांच्या इतर प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्याबाबत आश्वासन देण्यात आले आहे. परिवहनमंत्री यांनी दिलेल्या या आश्वासनाचा मान राखून महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स ॲक्शन कमिटी तसेच विविध वाहतूक संघटनांनी सध्या सुरू असलेले आंदोलन तात्पुरते मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी बैठकीत शासनाकडून सकारात्मक निर्णय अपेक्षित असून, वाहतूकदारांच्या न्याय्य मागण्यांवर योग्य तो मार्ग निघेल, असा विश्वास महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स ॲक्शन कमिटीने व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.