मुंबई

मुंबई महानगरपालिका प्रभाग समिती अध्यक्षपदी भाजप, शिवसेना आणि काँग्रेसची बाजी; ६ पैकी ३ ठिकाणी बिनविरोध निवड

CD

भाजप, शिवसेना, काँग्रेसची बाजी
महापालिका प्रभाग समिती अध्यक्षपदी सहापैकी तीन बिनविरोध निवड
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. ५ : महापालिकेच्या २०२६-२७ या वर्षासाठीच्या १७ प्रभाग समित्यांपैकी सहा समित्यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक गुरुवारी (ता. ५) झाली. या निवडणुकीत राजकीय चुरस पाहायला मिळाली. सहापैकी तीन ठिकाणी बिनविरोध निवड झाली, तर उर्वरित तीन ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये भारतीय जनता पक्षाने तीन, काँग्रेसने दोन आणि शिवसेनेने एक जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

​भाजपची तीन ठिकाणी मुसंडी
​भाजपने दक्षिण आणि उत्तर मुंबईत आपली पकड मजबूत ठेवली आहे.​ सी आणि डी प्रभागांसाठी भाजपचे आकाश राज पुरोहित यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. आर-मध्य आणि आर-उत्तर विभागात भाजपचे प्रकाश यशवंत दरेकर यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. आर-दक्षिण येथेही भाजपच्या लीना पटेल-देहेरकर यांनी बिनविरोध निवड झाली.

​काँग्रेस आणि शिवसेनेचा चुरशीचा विजय
​उर्वरित तीन प्रभाग समित्यांमध्ये प्रत्यक्ष मतदान झाले. जिथे महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये चुरस पाहायला मिळाली.​ ए, बी आणि ई प्रभाग समितीमध्ये काँग्रेसचे ज्ञानराज निकम सात मते मिळवून विजयी झाले. त्यांनी भाजपच्या रोहिदास लोखंडे (पाच मते) यांचा पराभव केला.​ एफ-दक्षिण व एफ-उत्तर या प्रभागांत शिवसेनेच्या मानसी मंगेश सातमकर सात मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी ठाकरे गटाच्या श्रद्धा जाधव (सात मते) यांचा अवघ्या एका मताने पराभव केला. या निवडणुकीत काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचे सदस्य अनुपस्थित होते. तर पी-पूर्व आणि पी-पश्चिम प्रभागात काँग्रेसचे हैदरअली अस्लम शेख १० मते मिळवून निवडून आले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अजित रावराणे (आठ मते) यांचा पराभव केला.
​या निवडणुकांसाठी महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांनी पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. महापौरांच्या उपस्थितीत ए, बी, ई, सी, डी आणि एफ या विभागांच्या निवडणुका झाल्या, तर उपमहापौरांनी आर आणि पी या विभागांच्या निवडणूक प्रक्रियेचे संचालन केले.
...
​निवडणुकीचा निकाल एका दृष्टिक्षेपात

प्रभाग समिती/ विजयी उमेदवार /पक्ष /स्वरूप

सी आणि डी /आकाश पुरोहित /भाजप/ बिनविरोध

आर-मध्य आणि आर-उत्तर /प्रकाश दरेकर /भाजप/ बिनविरोध

आर-दक्षिण /लीना पटेल - देहेरकर /भाजप /बिनविरोध

ए, बी आणि ई/ ज्ञानराज निकम/ काँग्रेस /मतदान (७-५)

एफ-दक्षिण व एफ-उत्तर /मानसी सातमकर /शिवसेना मतदान (८-७)

पी-पूर्व आणि पी-पश्चिम/ हैदरअली शेख /काँग्रेस /मतदान (१०-८)
........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs ENG SF: संजू सॅमसनची वादळी अर्धशतक! गौतम, रोहित, विराटच्या विक्रमाशी बरोबरी; इशानसह ९७ धावा जोडल्या

बीएमसी जिंकताच भाजपची मोठी चाल! मुंबईत ८१ सदस्यीय नवी फौज तयार; टीममध्ये उत्तर भारतीयांचा बोलबाला, कुणाकडे कोणती जबाबदारी?

आपला स्वतःचा चित्रपट आहे असं समजून... आगामी 'राजा शिवाजी' चित्रपटाबद्दल काय म्हणाला रितेश देशमुख

Phulambri News : सुवर्ण महोत्सवी सप्ताहात नामस्मरणाचा अखंड गजर, शेलगाव खुर्द येथे हजारो भाविकांची उपस्थिती; काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता

Kej Bus Accident : केज-कळंब रोडवर एसटी बसचा भीषण अपघात; चालक-वाहकासह १३ प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT